Homeमहाराष्ट्रआझाद क्रांती सेनेच्या लढ्याला यश,गौरवाडी तील दलित वस्तीला जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात

आझाद क्रांती सेनेच्या लढ्याला यश,गौरवाडी तील दलित वस्तीला जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील गौरवाडी येथील दलित वस्तीतील रहिवासी रामा लक्ष्मण दुनघव यांनी आपल्या कुटुंबासह तसेच गुरं-जनावरांसहित तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.या उपोषणा दरम्यान त्यांनी तहसील प्रशासनाने तात्काळ चौकशी करून शेतरस्ता वहीवाटीसाठी खुला करावा तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुन्हा सुरू करावी.अशी ठाम मागणी केली होती.या अन्यायाविरुद्ध आझाद क्रांती सेनेचे संस्थापक राजेश घोडे तसेच तालुका प्रमुख शरद थोरात यांनी पुढाकार घेत आंदोलनास पाठिंबा दिला आणि प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून दलित मातंग समाजातील ग्रामस्थांना न्याय मिळाला आहे.
तहसील प्रशासनाने चौकशी करून वस्तीला जाणारा शेतरस्ता वाहिवाटीसाठी नवीन मार्गाने तयार करून देण्यास सुरवात केली आहे.तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा पुन्हा चालू करण्याचे आदेश दिले आहेत.या निर्णया नंतर वस्तीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.ग्रामस्थांनी आझाद क्रांती सेनेचे संस्थापक राजेश घोडे तालुकाप्रमुख शरद थोरात यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले.थोरात यांनी यावेळी सांगितले की,आझाद क्रांती सेना नेहमीच अन्यायाविरुद्ध उभी राहील.समाजातील वंचित घटकांचा आवाज दबू दिला जाणार नाही.न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील.या प्रसंगी सेनेचे कार्यकर्ते,ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!