केज प्रतिनिधी
दि. ३१ ऑगस्ट रोजी उत्सव फंक्शन हॉल केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या वतीने ज्या कलावंतांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त झाला. अशा मान्यवरांचा सांस्कृतिक कला विश्व समिती च्या वतीने शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन या पुरस्कार प्राप्त कलावंतांचा सत्कार अगदी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ सीता ताई बनसोड या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड आर.पी.आय जिल्हा उपाध्यक्ष राहुल सरवदे गणेश गिरी ज्येष्ठ समाज कार्यकर्ते हनुमंत भोसले सर ज्येष्ठ पत्रकार डी .डी बनसोडे सर अशोक सोनवणे रणजीत घाडगे मुबशीर खतीब तात्या गवळी प्रदीप गायकवाड हे सर्व मान्यवरा उपस्थित होते हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन त्यांचे स्वागत केले तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सांस्कृतिक कला विश्व समितील चे कौतुक केले व ज्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान झाला त्या सर्व मान्यवरांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यामध्ये पुरस्कारार्थी ५१पुरस्कार प्राप्त असणारे गौतमजी खंडागळे सर मुंबई तसेच शासकीय व राज्यस्तरीय असे एकूण ४१ पुरस्कार विजेते प्रा. रमेश सरवदे सर अस्मिता सुरवसे रतन सवयी शकुंतला ससाने ललिता लांडगे निशा उजगरे या सर्व पुरस्कारार्थी विजेत्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला व त्यानंतर पुरस्कारार्थी सर्व कलावंतांनी सुंदर गीतांची मैफिल सादर करून आलेल्या पाहुण्यांचे व कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या नागरिकांना आपल्या गायनातून मंत्रमुग्ध केले या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल वैरागे मुनीर कुरेशी उमाकांत बोधने बलभीम मस्के सुनिता बोधने अनिता मुंडे विमल अंकुशे यांच्यासह सांस्कृतिक कलाविश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले.

















