आरोपींवर ॲट्रॉसिटी आंतरगत गुन्हा दाखल करण्यात यावा
केज /प्रतिनिधी
घारगाव :वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून दुचाकीस्वार व त्यांच्या साथीदाराने राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशाच्या फडातील कलावंतांवर हल्ला करत मारहाण व महिला कलावंतांनाही मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आला यांचा निषेध कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने आज निवेदन दिले बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास नाशिक -पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील व रुढी पठार शिवारात ही घटना घडली या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता या फडाचा संगमनेर तालुक्यात पोखरी बाळेश्वर येथे ३१ मार्चला कार्यक्रम होता तो संपून बुधवारी हे कलावंत तालुक्यातील माळेगाव पठार येथे कार्यक्रमासाठी वाहनातून जात होते महामार्गावर व रुढी पठार येथील एका पंपावर तमाशा कलावंतांची गाडी इंधन भरण्यासाठी थांबली होती त्यानंतर पुढे महामार्गाला वाहने लागल्यानंतर एका दुचाकी स्वाराने तमाशा कालावंतांच्या वाहनाला कट मारला त्यानंतर दुचाकी स्वराने पुढे जाऊन दुचाकी आडवी लावत तमाशा कलावंतांच्या वाहनाच्या चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर दहा मिनिटात त्याने तिथे ५० ते ६० जणांना बोलावून घेतले व त्या सर्वांनी मिळून संपूर्ण तमाशा कलावंतांना बेदन मागणी केली महिलांनाही मारहाण करत त्यांचे कपडे फाडले त्यानंतर विनयभंग केला तसेच मारहाण करणाऱ्यांनी काही रक्कम चोरून नेली अशी माहिती विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनी माहिती दिली. या सर्व गोष्टीचा केज येथील कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने व केज तालुक्यातील कलावंतांनी नायब तहसीलदार मा. अशोक भंडारे साहेब यांना देण्यात आले यावेळी अनिल वैरागे, मुनिर कुरेशी ,एडवोकेट अनिता मुंडे ,बलभीम मस्के, सचिन लांडगे, अमोल सरवदे, चंद्रकांत जाधव ,व केज तालुक्यातील सर्व कलावंतां उपस्थित होते.





















