Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

केज/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केज नगरपंचायतचे गटनेते हारूणभाई इनामदार यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी व मित्र परिवाराने मोठ्या उत्साहामध्ये सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला.
ज्येष्ठ नेते हारूणभाई इनामदार यांचा वाढदिवस हा १ जानेवारी या दिवशी असतो प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
यावर्षी कार्यकर्त्यांनी आणि मित्रपरिवारांनी हारुणभाई इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सर्वांचे श्रद्धास्थान असलेले शहरातील खाॅजा बाबा दर्गा येथे चादर चढवून खाॅजा बाबांचे आशीर्वाद घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व शौर्य दिनानिमित्त शूरवीरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज,संत भगवान बाबा, संविधान चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, स्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौक या शहरातील सर्व महामानवांच्या चौकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जीवन शैक्षणिक संकुल येथे अस्थिव्यंग विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले तर बंसल क्लासेस व जीवन शिक्षण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले. केज शहरा लगत बोबडेवाडी रोड वरील स्वामी समर्थ वृद्ध आश्रमातील आजी-आजोबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
हारुणभाई इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त १ जानेवारी रोजी केज शहरात जन्माला आलेल्या मुलींच्या नावाने प्रत्येकी मुलीच्या नावे १० हजार रुपयाची ठेव ठेवण्यात आली.१ जानेवारी रोजी मुलीचा जन्म झाला आहे अशा मुलीच्या पालकांनी आयोजक यांच्याकडे नोंद केली होती अशा मुलींच्या पालकांकडे मुलीच्या नावे ठेवण्यासाठी प्रत्येक मुलीच्या पालकास १० हजार रुपयाची रक्कम देण्यात आली.
हारुणभाई इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील अनेक प्रभागांमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
केज शहरातील छोटे व्यावसायिक, व्यापारी, सामाजिक राजकीय शैक्षणिक आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी आणि कार्यकर्ते, मित्र परिवारांनी हारुणभाई यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
हारुणभाई इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरातील गरजू नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप व गरजूंना जेवण युवा नेते लखन हजारे यांनी दिले. तर रक्तदान शिबिर व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि फळाचे वाटप भावी नगरसेवक युवा उद्योजक शाहरुख पटेल यांनी केले.
गटनेते राजूभाई इनामदार यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरजू महिलांना साड्यांचे वाटप केले. नगरसेवक जलालभाई इनामदार यांनी विद्यार्थ्यांना फळांचे व खाऊचे वाटप, वृद्धांना ब्लॅंकेटचे वाटप केले तर कार्यकर्ते व मित्रपरिवाराने ठीक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम घेऊन शहरातील प्रभागांमध्ये हारुणभाई इनामदार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
बीड रोड वरील जीवन शिक्षण संकुल येथे सायं.७-०० वाजता ज्येष्ठ नेते हारूभाई इनामदार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या अभिष्टचिंतन सोहळ्यास आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशरावजी आडसकर, केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुश रावजी इंगळे, नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड, ज्येष्ठ नेते दिलीप गुळभिले यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील व शहरातील छोटे व्यवसायिक, व्यापारी पत्रकार बांधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप हा शेवटी अल्पोहाराने करण्यात आला.

चौकट:-
*वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मुलांने स्वीकारले स्वामी समर्थ वृद्ध आश्रमाचे पालकत्व*
माझे वडील हारुणभाई इनामदार यांचा आज वाढदिवस आहे. आमचे वडील सातत्याने आजपर्यंत समाज कार्य करत आले आहेत त्यांच्या समाजकार्याचा आम्हाला वारसा आहे. आम्हाला आमच्या वडिलांनी दिलेली शिकवण व संस्कार आम्ही जोपासित आहोत व ते जपण्याचे काम करत आहोत. मी आज पासून स्वामी समर्थ वृद्ध आश्रमातील आजी-आजोबांची सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारित आहे.
यापुढे या वृद्धाश्रमातील ज्या काही गरजा असतील त्या आम्ही प्रमाणिकपणे पूर्ण करण्याचे काम करू तसेच या वृद्धाश्रमातील छोटी मोठी कामे करण्याबरोबरच दर महिन्याला लागणारे गहू, ज्वारी, तांदूळ यासह इतर किराणा सामान व आजी-आजोबांना कपडे आणि औषध गोळ्या याचबरोबर ज्या काही या वृद्धाश्रमात अडीअडचणी असतील त्या पार पाडण्याची सर्व जबाबदारी स्वीकारली आहे.
*जीशान हारूण इनामदार*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेष्ठ पञकार श्री.सतीश केजकर यांच्या वयाची साठी तर पत्रकारीतेची चौतीस वर्षे १६ जुन रोजी...

केज/प्रतिनिधी केज येथील ज्येष्ठ पत्रकार श्री.सतीश व्यंकटराव केजकर यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाली.तर पत्रकारितेत ३४ वर्षाचा पण प्रवास त्यांनी पूर्ण केला.त्यांनी वयाचे अर्धे...

संत महात्मे यांच्या उपस्थितीत साजरा झाला दगडूभाऊ दळवे यांचा वाढदिवस

केज प्रतिनिधी चिंचोली ( माळी) येथील कर्मवीर शिक्षण संस्थेचे संचालक, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला, शैक्षणिक ,राजकीय, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर, सर्वांच्या...

बीड जिल्हाधिकारी कार्यालय वर होणाऱ्या महामोर्चास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा-उमेश आवाड

केज /प्रतिनिधी केज.अ बर क ग उप वर्गीकरण आरक्षणाच्या स्मरणार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाचा महामोर्चा येणाऱ्या 16 जून ला धडकणार आहे. बऱ्याच वर्षापासून...

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

error: Content is protected !!