लातूर प्रतिनिधी
दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील आपल्या उत्कृष्ट गायनातून अनेक रसिकांना मंत्रमुग्ध करणारे कलावंत श्रीनिवास उत्तम नवगिरे यांची सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली सांस्कृतिक कला विश्व समितीचे मूळ कार्य म्हणजे कलावंतांना न्याय मिळवून देणे यासाठी अहोरात्र लढणारी संघटना आहे कलाकार हा कितीही दुःख असलं तरी ते हृदयामध्ये साठवून रसिक श्रोत्यांना आपल्या गायनाच्या माध्यमातून वादनाच्या माध्यमातून आपल्या कलेच्या माध्यमातून सतत आनंदी ठेवण्याचं काम करत असतो परंतु याच कलावंतांना कधी कधी अनेक अडचणीला सामोरे जावं लागतं अनेक शासकीय ठिकाणी आपला माता टिकून सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही आजपर्यंत आपण पाहत आलो आहे कलावंतांच्या न्याय हक्कासाठी कुठलीही संघटना किंवा राजकीय संघटना आजपर्यंत पुढे आली नाही तेव्हा कलावंतांनीच आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याकरिता सांस्कृतिक कला विश्व समिती स्थापन करून कलावंतांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून केले जाणार आहे हेच उद्देश या संघटनेचे आहे तेव्हा लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तेव्हा या संघटनेच्या लातूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व कलावंतांतून व नागरिकातून त्यांचे वरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




















