केज प्रतिनिधी
दि. २३ ऑगस्ट रोजी
केज येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी सांस्कृतिक कला विश्व समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त झालेल्या मान्यवरांचा तसेच बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचच्या नवनिर्वाचित बीड जिल्हा उपाध्यक्ष मा.ज्ञानेश्वर नागरगोजे तसेच बीड जिल्हा अध्यक्षापदी सुनिता नागरगोजे यांची अधिकृत रित्या नियुक्ती झाल्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा ही देण्यात आल्या तसेच या सत्कार सोहळ्यासाठी बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचा चे संस्थापक अध्यक्ष गायक संगीतकार दत्ता जी शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब केदार सर हे होते. तसेच या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती मा. वन अधिकारी सय्यद साहेब यांची उपस्थित होते यावेळी २०२६ मध्ये ज्या मान्यवरांना पुरस्कार प्राप्त झाले अशा मान्यवरांचा यावेळी सन्मान सोहळा अगदी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये केज तालुक्यातील तांबवा या ठिकाणचे जेष्ठ कलावंत शाहीर तुकाराम ठोंबरे यांना महाराष्ट्र शासनाचा लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रधान करण्यात आला होता तसेच एडवोकेट अनिता मुंडे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय सनक्रिस्टल गौरव पुरस्कार देण्यात आला तसेच अनिता कांबळे यांना नानासाहेब पाटील गौरव पुरस्कार शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा हा पुरस्कार देण्यात आला व गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व उत्कृष्ट गायिका हा राष्ट्रीय कलारत्न पुरस्कार केज तालुक्यातील सुनिता बोधने यांना प्राप्त झाला अशा होतकरू मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कला विश्व समितीचे सर्व पदाधिकारी तालुका अध्यक्ष अनिल वैरागे उपाध्यक्ष मुनीर कुरेशी उमाकांत बोधने सुभाष ढाकणे महिला तालुका अध्यक्ष सिंधू मुळे तसेच शहराध्यक्ष छबुताई अंधारे व विमल अंकुशे आदी मान्यवर उपस्थित होते.
















