श
केज / प्रतिनिधी
केज ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवून आणत रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. केशवराव इंगोले यांचा युवा नेते संदीपदादा शिंदे पाटील (महाबली) मित्र मंडळाच्या वतीने आज, १ सप्टेंबर रोजी भव्य सत्कार करण्यात आला.
रुग्णालयाच्या सुविधांमध्ये लक्षणीय वाढ
वैद्यकीय अधीक्षक डॉ. केशवराव इंगोले यांनी केज ग्रामीण रुग्णालयाचा कार्यभार हाती घेतल्यापासून रुग्णालयाच्या एकंदर चित्रामध्ये आणि सुविधांमध्ये मोठा सकारात्मक बदल झाला आहे. सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘सिटी स्कॅन’ (CT Scan) सुविधा आता रुग्णालयात सुरळीतपणे चालू आहे. यासोबतच मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि इतर अनेक प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही येथे यशस्वीपणे पार पाडल्या जात आहेत. डॉ. इंगोले यांच्या या रुग्णभिमुख आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत संदीपदादा शिंदे पाटील (महाबली)मित्र मंडळाने या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते.
मान्यवरांची उपस्थिती आणि भारावलेले वातावरण
केज येथील ग्रामीण रुग्णालयात पार पडलेल्या या सोहळ्यात डॉ. केशवराव इंगोले आणि त्यांच्या सर्व सहकारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शहरातील युवकांनी आणि नागरिकांनी दिलेल्या या उत्स्फूर्त प्रेमाने आणि सत्काराने डॉ. इंगोले भारावून गेले होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते हनुमंतराव भोसले सर, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब पाटील, पत्रकार विनोद शिंदे,पत्रकार प्रकाश मुंडे, महेश जाजू, वरुण शिंदे, प्रकाश गुंड, चंद्रकांत खरात, उमेश वाघ, चंद्रकांत जोगदंड, शरद नाईकवाडे, तात्या गालफाडे , बापू कराड, बाळासाहेब टांगसाळे, अविनाश लोंढे, गोविंद नेहरकर, माऊली गायकवाड , यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंतराव भोसले सर यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार डॉ. श्रीकृष्ण नागरगोजे यांनी मानले.




















