Homeमहाराष्ट्रकेज येथील सरस्वती कन्या प्रशाला येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व...

केज येथील सरस्वती कन्या प्रशाला येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा

विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेण्याची काळाची गरज-श्रीमती डोंगरे

केज/प्रतिनिधी

केज येथील सरस्वती कन्या प्रशाला येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका तथा प्राचार्या श्रीमती डोंगरे मॅडम म्हणाल्या की, विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेण्याचा काळाची गरज आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व बालिका दिनाचे औचित्य साधून सरस्वती कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या श्रीमती डोंगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वेशभूषा व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका तथा प्राचार्या श्रीमती डोंगरे मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला पालक श्रीमती मीरा गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या व शिक्षक वृंदांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जिजाऊ माॅसाहेब यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या, प्रत्येक वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांनी आप आपल्या वेशभूषा मनोगत व्यक्त करून विचार मांडले.
वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांनी मधून काही विद्यार्थिनीची प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्येष्ठ शिक्षक श्री.जोगदंड सर यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवर व शिक्षक वृंद यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका श्रीमती डोंगरे मॅडम यांनी सांगितले की, जर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले नसते तर आज मला व तुम्हाला शिक्षण मिळाले नसते . महिलांना शिक्षणाचे महत्त्व कळाले नसते. त्यांच्यामुळेच आज मुली महिलांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. म्हणून विद्यार्थिनींनी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी केले तर उपस्थितांचे आभार गुंड सर यांनी मानले.
यावेळी श्रीमती नेरकर मॅडम, श्रीमती मोटाडे मॅडम, श्रीमती लामतुरे मॅडम, श्री,जोगदंड सर, श्री.सुसंगे सर, श्री. गुंड सर यांच्यासह शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!