*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर*
केज/प्रतिनिधी
केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर बनसोड यांच्या एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न झाले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आंबा साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे ज्येष्ठ नेते रमेशरावजी आडसकर, केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार, प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सूतगिरणीचे चेअरमन विजय प्रकाश ठोंबरे, शिवसेना उ.बा.
ठा.गटाचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर आप्पा शिंदे, युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. केशव इंगोले, डॉ. दिनकर राऊत, प्रोफेसर प्रा.डॉ. गजानन गजभिये, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, क्रिकेट प्रेमी अकबर इनामदार, माजी जि.प. सदस्य विजयकांत मुंडे,नामांकित उद्योजक विकास आप्पा मिरगणे, रोटरी ऑफ क्लबचे अध्यक्ष असरार खुरेशी,रो. प्रवीण देशपांडे, नगरसेवक भाऊसाहेब गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर पाटील,केजचे तलाठी गोकुळ नादरले,श्रीकृष्ण लॅबचे श्रीकृष्ण नागरगोजे, नगरसेवक खैसर इनामदार, नगरसेविका पद्मिनी अक्का शिंदे, राष्ट्रवादीचे शरीफ सय्यद, ज्येष्ठ पत्रकार विनोद शिंदे, शिवसेनेचे माजेद सय्यद, लखन हजारे, ज्येष्ठ नेते बाबुराव गालफाडे, सतीश डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड व माजी मुख्याध्यापक प्रदीप बनसोड यांचे शुभ आशीर्वाद लाभले.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून श्रीफळ फोडून महामानवांच्या प्रतिमेचे धूपदीपाने पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन विवेक बनसोड, पवन बनसोड, सागर बनसोड, अशोक धीवार यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल, हार, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून बनसोड परिवाराने केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फ या नव्याने सुरू केलेल्या व्यवसायाला शुभेच्छा देऊन बनसोड परिवाराचे कौतुक केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना चेअरमन रमेशरावजी आडसकर म्हणाले की,बनसोड परिवाराने केज शहरात एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फ हा नव्याने व्यवसाय सुरू केला आहे या व्यवसायामुळे शहराच्या वैभवात भर पडणार असून तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे. नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी या ठिकाणी महिलांना देखील संधी उपलब्ध करून द्यावी. म्हणजे आपल्या शहरातून महिला खेळाडूंना प्रेरणा मिळेल. व मोठ्या प्रमाणात महिला खेळाडूंची संख्या वाढेल. महिला खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणजे आपल्या केज शहराचे नाव लोकिक होईल.
याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक राहुल सूर्यताळ यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सर्व मर्दानी खेळ खेळण्याची गरज आहे. खेळामुळे आपले शरीर हे निरोगीदायी राहते. आपल्या केज शहरातील खेळाडूंना क्रिकेट स्पर्धा,खो-खो स्पर्धा,फुटबॉल स्पर्धा,कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंना खेळाची संधी उपलब्ध करून देण्याची गरज.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार म्हणाले की, आपल्या केज शहरामध्ये क्रिकेट व फुटबॉल खेळण्यासाठी मैदानाची गरज होती. सामाजिक,राजकीय क्षेत्रात नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम यांचे उलखणीय काम असून त्यांची तिन्ही मुले संस्कारी आहेत त्यांनी क्रिकेट व फुटबॉल टर्फ या व्यवसायाची निवड केली आहे. या व्यवसायामुळे माझ्या शहरातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी,महिला, नागरिक, तरुणांनी याचा फायदा होणार आहे त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे इनामदार यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक एम.डी.घुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन साखरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोडे यांनी मानले.
यावेळी सामाजिक,राजकीय, शैक्षणिक,आरोग्य, पत्रकार, कला क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर व बनसोड परिवारावर प्रेम करणारे मित्रपरिवार आणि महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप हा शेवटी अल्पोपोहाराने करण्यात आला.























