परळी/ प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्याच्या वतीने गटसाधन परळी येथे सुगम गायन स्पर्धेचे व संगणकातील पीपीटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये श्री रत्नेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राध्यापक मा. प्रा. रमेश सरवदे यांनी शुभम गायन स्पर्धेत व सूर वाद्य अमोनियम वादनात प्रथम क्रमांक पटकाविला तर प्रा. गोविंदरावजी कांदे यांनी संगणक पी.पी.टी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याने या दोन होतकरू शिक्षकांची पुढे विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आले आहे विभागीय स्पर्धेच्या निवडीबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री गोविंद रावजी कांदे साहेब आणि संस्थेचे सचिव मा. श्री गोपाळराव कांदे साहेब यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तर परळी पंचकृशीतील सर्व शिक्षक वृंद व अधिकारी तसेच गावकऱ्यांमधून त्यांचे कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.























