Homeआरोग्यकेज उप जिल्हा रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी ; मिराताई कुलकर्णी यांच्या डोक्यातील...

केज उप जिल्हा रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी ; मिराताई कुलकर्णी यांच्या डोक्यातील गाठ काढली

केज/प्रतिनिधी

डॉक्टरची सेवा हीच ईश्वर सेवा आहे या उक्तीचा प्रत्यय नुकताच केजमध्ये आला.उपजिल्हा रुग्णालय केज येथील वैद्यकीय अधीक्षक तथा प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ.दत्तात्रय केंद्रे यांनी महिलेच्या डोक्यातील क्लिष्ट गाठ यशस्वी शस्त्रक्रिया करून काढून त्यांना जीवनदान दिले.या यशस्वी उपचारामुळे शासकीय रुग्णालया वरील सर्वसामान्यांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
नेमकी घटना काय?
सौ.मिराताई किशोरराव कुलकर्णी या गेल्या काही दिवसांपासून डोक्यातील गाठीच्या त्रासाने त्रस्त होत्या.खासगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च आणि गुंतागुंत लक्षात घेता, त्यांनी उपजिल्हा रुग्णालय केज येथे धाव घेतली.या ठिकाणी डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी रुग्णाची तपासणी करून तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांचे कौशल्य आणि कर्मचाऱ्यांची तत्परता
डॉ.केंद्रे यांच्या मार्गदर्शना खाली अत्यंत कौशल्याने ही शस्त्रक्रिया पार पडली.शस्त्रक्रियेनंतर मिराताई यांची प्रकृती आता उत्तम आहे.केवळ शस्त्रक्रियाच नव्हे,तर त्यानंतरच्या काळात डॉ. केंद्रे आणि त्यांच्या सहकारी कर्मचारी वर्गाने केलेली आस्थेवाईक विचारपूस आणि सुश्रुषा रुग्णासाठी मानसिक आधार देणारी ठरली. रुग्णालयातील कर्मचारी वर्गाच्या या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रुग्णसेवेचा आदर्श
शासकीय रुग्णालयातही खासगी रुग्णालयापेक्षा उत्तम दर्जाची सेवा आणि आपुलकी मिळू शकते,हे डॉ.केंद्रे आणि त्यांच्या टीमने सिद्ध करून दाखवले आहे.”रुग्णाला बरे करणे हे आमचे कर्तव्यच आहे,पण जेव्हा रुग्ण आनंदाने घरी जातो,तेव्हा आमच्या कष्टाचे चीज होते,”अशी भावना यावेळी डॉक्टरांनी व्यक्त केली.
“डॉ.दत्तात्रय केंद्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने माझी अत्यंत प्रेमाने काळजी घेतली. शासकीय रुग्णालयात इतकी आपुलकीची वागणूक मिळेल असे वाटले नव्हते. माझ्यासाठी ही सेवा खऱ्या अर्थाने ईश्वर सेवाच आहे.” — सौ.मिराताई किशोरराव कुलकर्णी (रुग्ण)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!