Homeमहाराष्ट्रकेज नगरपंचायतच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मधून ६ कोटी ३० लक्ष...

केज नगरपंचायतच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मधून ६ कोटी ३० लक्ष रुपयाचा निधी मंजूर

केज/प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार व कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांच्या प्रयत्नाला य

केज नगरपंचायतच्या माध्यमातून केज शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत ६ कोटी ३० लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध कित्येक वर्षापासून केज शहर विकासापासून कोसो दूर होते परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे जेष्ठ नेते हारुणभाई इनामदार व कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ‌.सीताबाई बनसोड यांच्या आथक परिश्रमाने केज शहराचा चेहरा मोहरा बदलताना दिसत आहे. यावेळी आम्ही पाहिलेले स्वप्न साकारताना दिसत असल्याचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले. याचबरोबर केज शहरात विविध विकासकामे गेल्या तीन-चार वर्षात होत आहेत आणि काही कामे प्रगतीपथावर आहेत. यावेळी बोलताना पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर असतानाही आम्ही संकटाला तोंड देत केज वासियांना पाणीपुरवठा करत आहोत यात पाणीपुरवठ्याची योजना अंतिम टप्प्यात असून या कामासाठी १२९ कोटींची योजना तांत्रिक मान्यता पर्यंत मंजूरी साठी अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात हे काम प्रत्यक्षात चालू होईल असे मत हारुणभाई इनामदार यांनी बोलताना स्पष्ट केले. तर केज शहराच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता ग्रह बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे यामुळे स्वच्छ शहर सुंदर शहर या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही यामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आमदार नमिताताई मुदडा खासदार रजनीताई पाटील रमेश रावजी आडसकर यांच्या प्रयत्नामुळे केज शहराला निधी उपलब्ध झाला असे मत व्यक्त करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला जिल्हा नियोजना मधुन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दादांचे आभार व्यक्त केले. केज शहरातील विकास कामे ही दलित वस्ती सुधारण्यासह मूलभूत कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून शहरात ज्या भागांमध्ये दलित वस्ती आहे अथवा दलित नागरिक हे ज्या भागात राहतात. या निधीमुळे शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली. मागील तीन ते चार वर्षापासून ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या प्रयत्नातून केज शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला असून जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन विभागाने एकाच दिवशी तीन प्रमुख योजनेतील कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. सहा कोटी तीस लक्ष रुपयाचा निधी दिल्यामुळे केज शहराच्या विकासासाठी भर पडली असून या मंजूर निधीमध्ये महाराष्ट्र नगरोत्थान महाबियन जिल्हास्तरीय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधार योजना आणि नागरी दलिततेत्तर वस्ती सुधार योजना या महत्त्वाच्या तीन योजनांचा समावेश आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांची लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे व शहरातल्या अन्य भागात मूलभूत सुविधा साठी निधीचा वापर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक ठिकाणचे नाल्या,रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन, स्वच्छता, शहरातील काही मुख्य रस्ते तर काही जोड रस्त्यांचे कामे पूर्ण झालेले आहेत तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत व उर्वरित कामे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत लवकरच केज शहराच्या विकासासाठी आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यांनी शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करणार आहोत असे नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी बोलताना स्पष्ट केले,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेष्ठ पञकार श्री.सतीश केजकर यांच्या वयाची साठी तर पत्रकारीतेची चौतीस वर्षे १६ जुन रोजी...

केज/प्रतिनिधी केज येथील ज्येष्ठ पत्रकार श्री.सतीश व्यंकटराव केजकर यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाली.तर पत्रकारितेत ३४ वर्षाचा पण प्रवास त्यांनी पूर्ण केला.त्यांनी वयाचे अर्धे...

संत महात्मे यांच्या उपस्थितीत साजरा झाला दगडूभाऊ दळवे यांचा वाढदिवस

केज प्रतिनिधी चिंचोली ( माळी) येथील कर्मवीर शिक्षण संस्थेचे संचालक, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला, शैक्षणिक ,राजकीय, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर, सर्वांच्या...

बीड जिल्हाधिकारी कार्यालय वर होणाऱ्या महामोर्चास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा-उमेश आवाड

केज /प्रतिनिधी केज.अ बर क ग उप वर्गीकरण आरक्षणाच्या स्मरणार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाचा महामोर्चा येणाऱ्या 16 जून ला धडकणार आहे. बऱ्याच वर्षापासून...

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

error: Content is protected !!