Homeमहत्त्वाचेनिकृष्ट दर्जाचे धान्य राशन धारकांना वाटप गरीबांची अवहेलना तात्काळ थांबवण्यात यावे-धनराज सोनवणे

निकृष्ट दर्जाचे धान्य राशन धारकांना वाटप गरीबांची अवहेलना तात्काळ थांबवण्यात यावे-धनराज सोनवणे

निकृष्ट दर्जाचे धान्य १० किलो देऊन अवहेलना करण्यापेक्षा २ किलो धान्य देऊन स्वाभिमानाने जीवन जगु द्यावे-रज्जाक सय्यद

केज/प्रतिनिधी

निकृष्ट दर्जाचे धान्य रेशन धारकांना वाटप करण्यात येत असून निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वाट तात्काळ थांबण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार केज यांच्याकडे करण्यात आली आहे. माध्यमाशी बोलताना रज्जाक सय्यद म्हणाले की, वंचित घटकातील गोरगरीब व लाभधारकांना शासनाने निकृष्ट दर्जाचे धान्य देण्यापेक्षा दोनच किलो धान्य द्यावे ते पण दर्जेदार द्यावे अशी मागणी केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, शासन स्तरावरून तहसील कार्यालया मार्फत तालुक्यातील व शहरातील स्वस्त धान्य दुकानदाराकडून रेशन धारकांना धान्याचे वाटप करण्यात येत आहे.
सध्या तांदूळ व ज्वारी (हायब्रीड)
या धान्याचे प्रशासनामार्फत शिधापत्रिका धारकांना वाटप चालू आहे परंतु सदरचे धान्य हे निकृष्ट दर्जाचे आहे. तांदूळ, ज्वारी (हायब्रीड) या धनला कीड लागलेली आहे यामध्ये आळ्या- जाळ्या, उंदराच्या व पालीच्या लेंड्या आणि मस्कीडे आढळून आले आहेत. सदर धान्यामध्ये माती व कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सदर धन्य किड्यामुळे त्यामध्ये धुरळा, फुफुटा झाल्याचे दिसून येत आहे. सदरचे धान्य हे कुजलेले असल्याचे जाणवत आहे सदर धान्य हे नागरिकांना खाण्यालायक नाही व सध्या वितरित, वाटप करण्यात येत असलेले धान्य हे जनावरासह इतर पशुधनांना हि खाण्यासाठी लायक नाही. या धान्यापासून नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकतो त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून सध्या वाटप करण्यात येत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या धान्याची वाटप तात्काळ थांबवण्यात यावी. सदर धान्यापासून काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली व आपल्या कार्यालयाची राहील असे लेखी निवेदनात म्हटले आहे. जर प्रशासनाने तात्काळ सध्या निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असलेले थांबवले नाही तर येत्या आठ दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा लेखी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला इशारा दिला आहे.
या लेखी निवेदनावर वंचित बहुजन आघाडी बीड पूर्वचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज सोनवणे, ज्येष्ठ नेते रज्जाक सय्यद, युवा नेते शरद धीवार, युवा नेते अमोल हजारे, शहर उपाध्यक्ष प्रवीण मस्के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
माध्यमांशी बोलताना रज्जाक सय्यद यांनी बोलताना म्हटले की, ग्रामीण भागातील व शहरातील बहुजन वर्गातील गोरगरीब नागरिक रेशनचे लाभधारक आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. शासन हे बहुजन समाजाच्या जीवनाशी व भावनेशी खेळत आहे शासनाने गोरगरीब जनतेचा खेळ मांडला आहे परंतु आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाचा डाव हाणून पाडणार आहोत.असे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!