अनुष्का पाटोळे फासी प्रकरणात केज येथे भव्य रस्ता रोको आंदोलन संपन्न
केज प्रतिनिधी
लातूर येथील नवोदय विद्यालयात आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली मातंग समाजाची अंत्यत हुशार मुलगी अनुष्का पाटोळे हिस नवोदय विद्यालयातील व्यस्थापन करीत असलेल्या प्राचार्य, कर्मचारी, यांनी पट्यानी बेदम हानमार करून फासी घेतलेल्याचा बनाव केला. या संदर्भात केज शहरातील सर्व पक्ष, संघटना यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, केज येथे सकाळी 11 ते 01 पर्यंत भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. मा. तहसीदार, केज यानां निवेदन देऊन अनुष्का पाटोळे प्रकरणाची एस आय टी स्थापन करून चौकसी करावी. तसेच नवोदय विद्यालयातील सि. सि. टि व्ही. फुटेज जप्त करून निष्पक्ष चौक्सी करण्यात यावी, तसेच नवोदय विद्यालयचे प्राचार्य व एम.आय डि सी. पोलीस स्टेशनचे पी. आय. यांना सह आरोपी करून ऍक्ट्रासिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात यावा. या रस्ता रोको आंदोलनास रोहित कसबे, बाबुराव गालफाडे सर, सुनील हिरवे, लखन हजारें, प्रियका लांडगे, शितल लांडगे, दत्ता लांडगे, अशोक गायकवाड, कपिल मस्के, योगेश गायकवाड, इरफान पठाण, अनिल लोखंडे, शरद थोरात, साहिल तांबोळी, दिलीप गालफाडे, अमान पठाण, सर्व बहुजन समाजातील युवक, महिला, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.





















