केज/प्रतिनिधी
केज शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ११७ कोटी ६६ लाख ७९ हजार ३०० रुपयाच्या निधीला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठांचे आणि पत्रकार बांधवांचे राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्षाचे नेते तथा गटनेते ज्येष्ठ डॉ. हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई यांनी आभार मानले. आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांनी म्हटले की, केज शहराला पाण्याचा थेंबही कमी पडू देणार नाही, नवीन पाणीपुरवठा योजनेचा शासन स्तरावर पाठपुरावा करून सर्व प्रक्रिया पूर्ण करून येत्या तीन महिन्यात कामाला प्रत्यक्षात सुरुवात करणार आहेत.या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी किमान दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लागेल. तर नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांनी बोलताना सांगितले की, सध्याची जुनी पाणीपुरवठा योजना ही जीर्ण झालेली असल्यामुळे सतत ना दुरुस्त होत आहे आम्ही वेळोवेळी दुरुस्तीचे काम करत आहोत त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणात गरजेनुसार बोरवेल घेतलेले आहेत व आज रोजी बोरवेल घेण्याचे काम चालू आहे. यापुढेही भविषात गरजेनुसार आम्ही बोरवेल चे नियोजन करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावत आहोत, नागरिकांना पाण्याची अडचण भासू देणार नाहीत. शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी,नागरी सुविधा,नागरिकांच्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी आमचे नेते हारुणभाई इनामदार व मी आणि आमचे सर्व नगरसेवक आम्ही कट्टीबद्ध आहोत असे बोलतांना सांगितले.
स्व. विमलताई मुंदडा यांच्या कार्यकाळामध्ये केज शहराला पाणीपुरवठा योजना कार्यविनित करण्यात आली होती परंतु हे पाणीपुरवठा योजनेचा कालावधी हा जवळपास तीस ते पस्तीस वर्षाचा झालेला असून सदर योजना ही निकामी झालेली आहे त्याचबरोबर केज शहराची वाढती लोकसंख्या व पूर्वीच्या लोकसंख्येत आणि आज रोजी च्या लोकसंख्येमध्ये केज शहराची व्याप्ती वाढलेली आहे. यामुळे केज शहरात गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न ज्वलंत व भेडसवणारा होता. जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून केज नगरपंचायत ची सत्ता गटनेते हारूणभाई इनामदार नगराध्यक्षा सौ.सीताताई यांच्याकडे आली तेव्हापासून केज शहराच्या विकासातील सर्वात ज्वलंत असा मोठा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर गटनेते हारूणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी पाठपुरावा करून नवीन पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी मिळवली आहे. या महत्वकांक्षी योजनेमुळे पाणी योजनेचा प्रश्न हा निर्णय टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. उर्वरित प्रक्रिया ही येणाऱ्या तीन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती गटनेते हारूणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले आहे.
केज नगरपंचायत वर जनविकास परिवर्तन आघाडीची सत्ता येताच गटनेते व नगराध्यक्षा यांनी या योजनेचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली असता पूर्वीची ही योजना ३५ कोटी रुपयाची प्रस्तावित होती. परंतु यामध्ये सध्याची शहराची वाढती लोकसंख्या व पुढील ३० ते ३५ वर्षांमध्ये वाढणारी लोकसंख्या याचा लेखाजोखा घेऊन वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन व वरिष्ठांच्या सल्ल्याने आणि सखोल अभ्यास करून भविष्यातील वाढती लोकसंख्या, पाण्याची गरज, जुल साठवण क्षमता, चेहरा अंतर्गत पाईपलाईन, पाणीपुरवठा योजनेसाठी लागणारा वीजपुरवठा सर्व टेक्निकल, तांत्रिक बाबींचा अभ्यास करून व आढावा घेऊन सदर योजनेत आवश्यक ते बदल करून११७ कोटी ६६ लाख ७९ हजार ३०० रुपयाची या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.
या योजनेमध्ये धनेगाव पासून ते केज शहरा पर्यंत व शहरातील अंतर्गत पाईपलाईन यासह जवळपास ९० ते ९६ किलोमीटरची नवीन पाईपलाईन, शहरातील बीड रोडवरील सध्याच्या पाणीच्या टाकीच्या येथे-२, भवानी माळ येथे-१ बीड रोडवरील कचरा डेपो येथे-१, कळंब रोड परिसरात-१ अशा एकूण ५ नवीन पाण्याच्या टाक्या (जलकुंभ), विद्युत पुरवठा साठी सौर ऊर्जा प्रकल्प, पंपिंग व्यवस्था, शहरातील अंतर्गत पाईपलाईन करतेवेळी रस्त्यांची दुरुस्ती, यासह इतर नाविन्यपूर्ण बाबीच्या आधारे ही योजना केज शहराच्या चारीही बाजूंच्या सीमा हद्दीपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील पाणी वितरण व्यवस्था ही अधिक सक्षम होणार असून याचा शहरवासीयांना नियमित वेळे त मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने याचा फायदा शहरवासीयांना होणार आहे असे पत्रकार परिषदेत गटनेते हारूणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोडे यांनी माहिती दिली.
ही योजना केज शहरासाठी भविष्यात फायद्याची ठरणारी आहे या योजनेला तांत्रिक मान्यता मिळणे हा महत्त्वाचा टप्पा होता यापुढे शासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून प्रत्यक्ष कामाला तीन महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे.
या योजनेचा पाठपुरावा करत असताना स्व. अजित दादा पवार यांनी केलेले सहकार्य व पाठपुरावा आणि प्रयत्न याची आठवण हरून भाई व सीताताई बनसोड यांनी आवर्जून केली आहे. स्वर्गीय अजितदादा यांच्या निधनानंतर या योजनेसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचे हारुणभाई इनामदार व सीताताई बनसोडे यांनी विशेष आभार मानले.
केज शहराचा विविध विकास कामे करत असताना कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता फक्त आणि फक्त आपल्या गावाचा विकास हेच ध्येय साकारून आम्ही पारदर्शक कारभार करत आहोत. केज नगरपंचायत च्या कामकाजात कसल्याच प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही आम्ही भ्रष्टाचाराला थरा दिला नाही व भविष्यात दिला जाणार नाही अशी गटनेते हारूणभाई इनामदार यांनी ठाम भूमिका मांडली. आम्हाला जनतेने सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे त्यामुळे आम्ही कायम जनतेचा विश्वास ठेवत आलो आहोत याही पुढे आम्ही विकास कामे पारदर्शकपणे पूर्ण करण्याची आमची जबाबदारी आहे. आम्ही केज वासीयांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे आश्वासन केजवासीयांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इनामदार यांनी दिली आहे.




















