Homeमहाराष्ट्रहजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत भगवान श्रीकृष्ण मंदिरांचे भुमीपुजन संपन्न,ढोक महाराज यांच्या काल्याच्या...

हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत भगवान श्रीकृष्ण मंदिरांचे भुमीपुजन संपन्न,ढोक महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता

केज/प्रतिनिधी
हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत भगवान श्रीकृष्ण मंदिरांचे भुमीपुजन श्री.१००८ स्वामी चिन्मय पुरीजी महाराज व भागवत भुषण ह.भ.प.केशव महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
ह.भ.प.रामराव महाराज
ढोक यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.यावेळी त्यांनी चुराचुराकर माखन खाया या अभंगावर काल्याचे किर्तन केले.यावेळी अभंगाचे निरुपण करताना ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांनी सांगितले की,मानवी जन्म भाग्याने मिळतो.तो भारत देशात मिळावा तसेच महाराष्ट्रात मिळावा हे परमभाग्य आहे.देव,भक्त व नाम जिथे असेल तेथे काला होतो म्हणून महाराष्ट्रात काला होतो.देवाच्या प्रसाद अधिकारी मानवाला मिळतो म्हणून काला मिळतो असे त्यांनी सांगितले.स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे माझ्या किर्तनाला आवर्जून येत होते.ज्ञानेश्वर माऊली व मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजही किर्तन सेवा होत आहे. भगवान श्रीकृष्ण मंदिरांचे संपूर्ण स्टील राजाभाऊ घुले व विष्णु भाऊ घुले पुरवणार आहेत तसेच काल्याची पंगतही त्यांनी घेतली आहे. महा विष्णुयज्ञात पवित्र झालेली वीट घरी २०० देऊन भाविकांनी घरी न्यावी या जमा झालेल्या रक्कमेतुन वीटा मंदिर बांधकामासाठी वापरण्यात येणार आहेत असे ह.भ.प.केशव महाराज शास्त्री यांनी सांगितले.आचरण रामाचे करावे तर चरीत्र कृष्णाचे उच्चारावे मागणी केल्या नंतर मिळते ते आश्वासन व न मागता मिळतो तो आशिर्वाद असे ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी सांगितले.बाल श्रीकृष्ण चरित्र सांगुन काल्याच्या किर्तनाची सांगता झाली.यावेळी पावनधाम संस्थानचे महंत ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री, रमेशराव आडसकर, युवा नेते रणजीत भैय्या आडसकर,सौरव भैय्या सोनवणे,रमाकांत बापू मुंडे,सुधाकर बापु लांब, अनंतराव घुले,श्रीकांत घुले,शिवराम घुले यांच्या सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह.भ.प.केशव महाराज शास्त्री यांनी सप्ताह यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.महाप्रसादाने कार्यक्रम संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!