केज | प्रतिनिधी
सध्या बीड जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पद भरती च्या संदर्भात तर मुलाखती अंतिम टप्प्यात आले आहेत. परंतु या पोलिस पाटील पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी प्रतीक्षा यादी ही केवळ एक वर्षापूर्वीच न ठेवता ती दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ करण्यात यावी अशी मागणी दिनकर जाधव यांनी प्रसिद्धीपत्रक आणि जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
१९ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेली बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील पद भरती ही जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या वतीने अत्यंत पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. यामुळे जिल्हा प्रशासनावर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास अधिकच दृढ झाला आहे. ही बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील पद भरती आता अंतिम टप्प्यात आली असून या पद्धतीमध्ये एकूण चार उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचे समजते यामध्ये पहिला उमेदवार हा प्रमुख दावेदार असून त्यानंतर तीन उमेदवार हे प्रतीक्षा यादी मध्ये असणार आहेत अशी माहिती अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेली एका सोशाल मिडियावर पहावयास मिळत आहे ही बाब अत्यंत चांगली आहे. परंतु ही प्रतीक्षा यादी केवळ एक वर्षाकरिता असणार असून हा कालावधी दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ करण्याची मागणी पुरोगामी पत्रकार संघाचे केज तालुका अध्यक्ष दिनकर जाधव यांनी निवेदनाद्वारे तसेच प्रसिद्दी पत्रकाद्वारे केली आहे.
या पोलिस पाटील पद भरतीमध्ये ९०% गावातील एमपीएससी ची तयारी करत असलेले उमेदवार, तसेच सरळ सेवा परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले उमेदवारांनी परीक्षा दिल्या आहेत ही गोष्ट अत्यंत अभिमानाची असली तरी निवड होणारे एक आणि दोन नंबरचे उमेदवार हे एक वर्ष किंवा दोन वर्षाच्या आत मध्ये दुसरीकडे शासकीय सेवेत रुजू होऊ शकतात. कारण हे परीक्षार्थी गेल्या अनेक दिवसापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे बहुतांश गावातील नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे एक किंवा दोन वर्षांमध्ये एक आणि दोन नंबरचे उमेदवार हे पुन्हा दुसर्या शासकीय सेवेत जाणार आणि नंतर पुन्हा या जागा रिक्त राहणार त्यामुळे निवड समिती यांनी या मागणीचा योग्य विचार करून प्रतिक्षा यादी ही दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी करण्यात यावी अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघाचे केज तालुका अध्यक्ष दिनकर जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे पोलिस पाटील पदभरती निवड समितीकडे केली आहे.





















