जनसंवाद न्यूज

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
केज, प्रतिनिधी :

आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय वर्षे ६ ते १६ या वयोगटातील बालस्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला तालुकाभरातून मोठा प्रतिसाद लाभला. एकूण ३६ स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या सुरेल आवाजाने आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.

बालवयातच भजन, अभंग आणि वारकरी परंपरेची गोडी निर्माण व्हावी, तसेच नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रतिष्ठानने या स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रत्येक स्पर्धकाने उत्कृष्ट सादरीकरण करून परीक्षकांसमोर आपल्या गायनकलेची छाप पाडली. त्यामुळे स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. शाश्वती उदय कुंभकर्ण तिने पटकावला तर स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घवघवीत यश प्राप्त केले यामध्ये द्वितीय क्रमांक कु. सुनिष्ठा उमाकांत बोधणे, तर तृतीय क्रमांक चि. अगस्त्य अशोक सोनवणे याने पटकावला. तर आत्मजा अनिल  रोडे तिने देखील उत्कृष्ट सादरीकरण केले कुमारी सुनिष्ठा   उमाकांत बोधने हिने “घागर घेऊन” ही गवळण सादर केली तर अगस्त अशोक सोनवणे यांनी “कानडा राजा पंढरीचा” या अभंगांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले व आत्मजा रोडे हिने “धरीला पंढरीचा चोर” हा अभंग सादर केला. या विद्यार्थ्यांचे यश पाहून केज शहरातील नागरिकांकडून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.या

स्पर्धेसाठी प्रा. बालाजी मानगिरे (बीड) व प्रा. प्रसाद कुलकर्णी (जवळबन) यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांनी स्पर्धकांच्या सादरीकरणाचे गायन, स्वर, ताल, उच्चार आणि भावसंपन्नता या निकषांवर परीक्षण केले. श्री. पवन चंदनशिव व श्री. पद्मनाभ देव यांच्या बहारदार साथीने कार्यक्रमाची रंगत अधिक खुलली.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे ह.भ.प. श्री. केशव महाराज शास्त्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी श्रीमती शोभा केजकर, श्री. शामराव काळे, श्री. संजय पोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने पालक व रसिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अभय कुंभकर्ण यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री कलोपासक प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांतजी देव यांनी सांगितले की, “वारकरी परंपरा, भक्ती आणि सांस्कृतिक मूल्ये जपण्यासाठी तसेच बालकलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यातही अशाच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल.”

ही स्पर्धा केवळ एक सांगीतिक स्पर्धा न ठरता, बालकलावंतांमधील भक्तीभाव, आत्मविश्वास आणि कलागुणांना वाव देणारा संस्मरणीय सांस्कृतिक सोहळा ठरला.

The post केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश appeared first on जनसंवाद न्यूज.

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
अंबाजोगाई/प्रतिनिधी

अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता पूर्ववत मोकळा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांनी दिला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात या निर्णयाचे स्वागत होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

मौजे पाटोदा (म.) येथील गट क्र.३७२, ३७३,३७४,३७५ व ३७६ मधील शेतकरी मागील अनेक वर्षां पासून आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी लगतच्या गट क्र.२८८ मधील होळणा नदीच्या दक्षिण बाजूस असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्याचा बैलगाडी व शेतमाल वाहतुकीसाठी वापर करत होते.मात्र, काही महिन्यांपूर्वी गट क्र.२८८ चे शेतकरी मनिषा दिलीप वळसे व इतर यांनी या रस्त्यावर नारळाची रोपटी लावून तसेच लोखंडी तारांचे बेकायदेशीर कुंपण व गेट उभारून शेतकऱ्यांची वहीवाट पूर्णपणे बंद केली होती.त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीकाम, मशागत व शेतमालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात अडचणीत आली होती.

न्यायालयीन लढा

या अन्यायाविरुद्ध अर्जदारॲड.श्रीनिवास कुलकर्णी,ॲड.सचिन कुलकर्णी,रत्नाकर भागोराम पन्हाळे व इतर शेतकऱ्यांनी अंबाजोगाई तहसीलदार न्यायालयात मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम ५ अन्वये रस्त्यावरील अडथळे दूर करून रस्ता खुला करण्या साठी अर्ज दाखल केला.दि.२० एप्रिल २०२६ रोजी प्रकरण दाखल करण्यात आले. प्रकरणात मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. त्यामध्ये रस्त्यावर बेकायदेशीर तारांचे कुंपण व लोखंडी गेट उभारल्याचे स्पष्ट झाले.

तहसीलदारांचा आदेश

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल आणि साक्षीदारांची शपथपत्रे विचारात घेऊन तहसीलदार विलास तरंगे साहेब यांनी अर्जदारांचा अर्ज मंजूर केला.दि.१ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशात गट क्र.२८८ मधील शेत रस्त्यावरील तारांचे कुंपण,लोखंडी गेट व इतर सर्व अडथळे तात्काळ दूर करून शेतरस्ता वहिवाटीसाठी खुला करून पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले.तसेच भविष्यात या रस्त्यावर प्रतिवादीने कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नये, असेही प्रतिवादींना निर्देश देण्यात आले.

शासन निर्णयाचा आधार

महसूल व वन विभागाच्या दि.२२ मे २०२५रोजीच्या शासन निर्णयाचा आधार घेत आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर,रोटाव्हेटर, हार्वेस्टर यांसारखी कृषी अवजारे सहज जाऊ शकतील तसेच शेतमालाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी पारंपरिक अरुंद रस्त्यां ऐवजी किमान ३ ते ४ मीटर (सुमारे १५ फूट) रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता या आदेशात अधोरेखित करण्यात आली आहे.

तसेच सदर शेत रस्त्याची नोंद अधिकृत पणे ७/१२ च्या ‘इतर हक्क’ सदरात घेण्याचे आदेशही ग्राम महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.दिनांक २४ जुलै २०२६ रोजी तहसीलदार अंबाजोगाई यांचे आदेश क्रमांक ५४६/ २०२६ यांच्या अंमलबजावणी अंतर्गत महसूल प्रशासनाने प्रत्यक्षपणे कारवाई करत शेत रस्त्यावरील लोखंडी ताराचे कुंपण काढून व इतर अडथळा दूर करून अतिक्रमित शेतरस्ता खुला केला.

यावेळी रत्नाकर भागोराम पन्हाळे,बाबू वली खा पठाण, देवानंद भगवान पाडुळे,अय्युब उस्मान खान पठाण,दत्ता साखरे, बळी घोरपडे, ॲड.शिरीषकुमार मुकडे,बाळासाहेब घोरपडे,मिलिंद बाळकृष्ण कुलकर्णी, विपिन विलासराव कुलकर्णी,खाजमिया पठाण,अमीन शेख, ज्ञानोबा सूर्यवंशी, गोविंद अण्णासाहेब जामदार,अशोक गोपीनाथ गाडवे, सुनील घोरपडे,मारुती सरवदे यांच्यासह परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल तसेच तात्काळ प्रत्यक्ष कारवाई करून रस्ता खुला करून दिल्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार विलास तरंगे साहेब, मंडळ अधिकारी भुसेवाड साहेब,तलाठी बनसोडे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्र शासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

The post अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय appeared first on जनसंवाद न्यूज.

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व व्यापाऱ्यांचा सहभाग
केज:प्रतिनिधी

नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार गुरुवारी दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने केज शहरात शांततेत बंद पाळण्यात आला. या बंदला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

बंदची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, केज येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर जय भीम, जय संविधान अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शहरातून शांततेत रॅली काढण्यात आली. रॅली तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर बलप्रयोग करणे हा भारतीय लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर आघात असून या घटनेची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य कराव्यात, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची शासनाने हमी द्यावी तसेच संपूर्ण घटनेची नैतिक व राजकीय जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनीही राजीनामा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस भाई गुंड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राहुल खोडसे, बहुजन विकास मोर्चाचे तालुकाध्यक्ष लखन हजारे तसेच ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष समाधान बचुटे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला.यावेळी प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाचा तीव्र निषेध व्यक्त करत लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न अस्वीकार्य असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

केज शहरातील व्यापाऱ्यांनीही बंदला चांगला प्रतिसाद दिला. संपूर्ण आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के, लिंबराज गायकवाड, रज्जाक शेख, धनराज सोनवणे,अमोल हजारे,शरद धिवार,प्रवीण मस्के, उमेश कांबळे, अनंत शिनगारे, प्रदीप गायकवाड, लक्ष्मण ओव्हाळ, सतीश बनसोडे, यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, महिला-पुरुष कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

The post विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद  विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व व्यापाऱ्यांचा सहभाग appeared first on जनसंवाद न्यूज.

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड
बीड/ प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा

दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी माजी कुलगुरू मा.सर्जेरावजी निमसे सर अहिल्यानगर आणि उद्योजक, वक्ता, लेखक मा एन. बी. धुमाळ साहेब अहिल्यानगर यांच्या शुभ हस्ते आष्टी येथे होणार आहे.

राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृह जामखेड रोड, आष्टी

सकाळी १० वाजता

संपन्न होणार आहे या मराठा सेवा संघ प्रणित कानुबाई बिरजे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा सन्मान दिला जातो यावेळी देखील महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट गायक गौतम कान्हु खंडागळे यांना गायन क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहे तसेच केज येथील अनिल वैरागे यांना गायन व वादन या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार प्रदान होणार आहे तर एम एम शेख यांना देखील उत्कृष्ट गायक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्याचबरोबर गायन क्षेत्रातील गोड गळ्याच्या गायिका अस्मिता अहिरे, ललिता लांडगे प्रियंका भंडारी, निशा उजगरे, आम्रपाली साबळे, आकाश जाधव, या सर्व कलावंतांना संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केल्याची पावती म्हणून  हा पुरस्कार देण्यात येणार आहे या पुरस्कारासाठी या सर्व कलावंतांनी आज पर्यंत केलेले कार्य पाहून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तेव्हा बीड जिल्ह्यातील या दिग्गज कलावंतांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

The post बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड appeared first on जनसंवाद न्यूज.

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय, ३० हजार रुपयाच्या दंडाचीही शिक्षा
केज/प्रतिनिधी

केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवार दि.१७ जुलै रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्याला ३० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.दि.२३एप्रिल २०२४रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या  सुमारास केज येथील वसंत विद्यालया जवळील क्रांतीनगर परिसरात गोरख महावीर हजारे वय १८ वर्षे आणि अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता.यावेळी आरोपीने गोरख हजारे याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

त्यानंतर काही वेळाने अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे याने शर्टमध्ये लपवून ठेवलेल्या धारदार शस्त्राने गोरख हजारे यांच्या गळ्यावर वार केले होते.या हल्ल्यात गंभीरजखमी झालेल्या गोरख हजारे यांना नातेवाईकांनी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारा पूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या प्रकरणी मयत गोरख हजारे यांचे नातेवाईक राज संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.तत्कालीन

पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले आणि आर. के.शेख यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले.फिर्यादीची साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पुरावे तसेच सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले.सहाय्यक सरकारी वकील अॕड. राम बिरंगळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे रा. क्रांतीनगर,केज याला   जन्मठेप आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्यात सहाय्यक सरकारी वकील अॕड. राम बी.बिरंगळ यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.त्यांना सहाय्यक सरकारी वकील अॕड.रविकुमार उदार आणि पैरवी पोलीस कर्मचारी रमा भालेराव यांनी सहकार्य केले.

चौकट

आरोपीला शेतातून घेतले होते ताब्यात

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे याला बोबडेवाडी येथील शेतातून ताब्यात घेतले होते.या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक चेतनातिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना,पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन,पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,आनंद शिंदे, वैभव सारंग तसेच पोलीस कर्मचारी श्रीकांत चौधरी, रुक्मिणी पाचपिंडे, बाळासाहेब अहंकारे, संतोष गित्ते,सचिन अहंकारे,शेख मतीन, प्रकाश मुंडे आणि चालक संभुदेव दराडे यांनी सहभाग घेतला होता.

The post केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय, ३० हजार रुपयाच्या दंडाचीही शिक्षा appeared first on जनसंवाद न्यूज.

नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड व जेष्ठ नेते डॉ. हारुणभाई इनामदार बीड भुमिपुत्र पुरस्काराने सन्मानित*
केज/प्रतिनिधी

दैनिक लोकमत परिवाराच्या वतीने देण्यात येणारा लोकमत बीड भुमिपुत्र २०२६ चा पुरस्कार हा नुकताच बीड जिल्ह्यात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना जाहिर करण्यात आला होता. या पुरस्काराचे वितरण सोमवार रोजी छत्रपती संभाजी नगर येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये केज शहरासह तालुक्यातून केजच्या प्रथम नागरिक तथा केजच्या नगराध्यक्षा डॉ.सीताताई बनसोड व राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केज नगरपंचायतचे गटनेते डॉ.हारूणभाई इनामदार, केज पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ.सरोजनी दादासाहेब ससाने व बीड येथून दैनिक मराठवाडा दर्शनचे संपादक दत्तात्रय हंडीबाग यांना दैनिक लोकमत परिवाराच्या वतीने २०२६ च्या बीड भूमिपुत्र पुरस्कार या  पुरस्काराने गौरविण्यात आले.

डॉ.हारुणभाई इनामदार हे गेल्या ३० ते ३५ वर्षापासून सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. इनामदार यांच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना दैनिक लोकमत परिवाराच्या वतीने २०२६ चा लोकमत बीड भूमिपुत्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच केज नगरीच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात ही रमाई महिला विकास संस्थेच्या माध्यमातून सुरू झाली. त्यांनी मागील २५ ते ३० वर्षांमध्ये सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले असून नगराध्यक्षा डॉ. सौ.सीताताई बनसोड यांच्या  कार्याची दखल घेऊन त्यांनाही लोकमत बीड भूमिपुत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक १३ जुलै २०२६ रोजी फर्न रेसिडेन्सी येथे दुपारी ४-३० वाजता माजी केंद्रीयमंत्री डॉ. भागवतराव कराड, सिनेअभिनेते अशोक शिंदे यांच्यासह लोकमत समूहाचे प्रमुख मार्गदर्शक, मान्यवरांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ मान्यवरांना लोकमत बीड भूमिपुत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व दैनिक लोकमत समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप शेवटी स्नेह भोजनाने करण्यात आला.

The post नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड व जेष्ठ नेते डॉ. हारुणभाई इनामदार  बीड भुमिपुत्र पुरस्काराने सन्मानित* appeared first on जनसंवाद न्यूज.

छत्रपती संभाजीनगर येथे २०२६ चा लोकमत बीड भूमिपुत्र पुरस्कार सोहळा संपन्न* *नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड व जेष्ठ नेते डॉ. हारुणभाई इनामदार बीड भुमिपुत्र पुरस्काराने सन्मानित*
केज/प्रतिनिधी

दैनिक लोकमत परिवाराच्या वतीने देण्यात येणारा लोकमत बीड भुमिपुत्र २०२६ चा पुरस्कार हा नुकताच बीड जिल्ह्यात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना जाहिर करण्यात आला होता. या पुरस्काराचे वितरण सोमवार रोजी छत्रपती संभाजी नगर येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये केज शहरासह तालुक्यातून केजच्या प्रथम नागरिक तथा केजच्या नगराध्यक्षा डॉ.सीताताई बनसोड व राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केज नगरपंचायतचे गटनेते डॉ.हारूणभाई इनामदार, केज पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ.सरोजनी दादासाहेब ससाने व बीड येथून दैनिक मराठवाडा दर्शनचे संपादक दत्तात्रय हंडीबाग यांना दैनिक लोकमत परिवाराच्या वतीने २०२६ च्या बीड भूमिपुत्र पुरस्कार या  पुरस्काराने गौरविण्यात आले.

डॉ.हारुणभाई इनामदार हे गेल्या ३० ते ३५ वर्षापासून सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. इनामदार यांच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना दैनिक लोकमत परिवाराच्या वतीने २०२६ चा लोकमत बीड भूमिपुत्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच केज नगरीच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात ही रमाई महिला विकास संस्थेच्या माध्यमातून सुरू झाली. त्यांनी मागील २५ ते ३० वर्षांमध्ये सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले असून नगराध्यक्षा डॉ. सौ.सीताताई बनसोड यांच्या  कार्याची दखल घेऊन त्यांनाही लोकमत बीड भूमिपुत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक १३ जुलै २०२६ रोजी फर्न रेसिडेन्सी येथे दुपारी ४-३० वाजता माजी केंद्रीयमंत्री डॉ. भागवतराव कराड, सिनेअभिनेते अशोक शिंदे यांच्यासह लोकमत समूहाचे प्रमुख मार्गदर्शक, मान्यवरांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ मान्यवरांना लोकमत बीड भूमिपुत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व दैनिक लोकमत समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप शेवटी स्नेह भोजनाने करण्यात आला.

The post छत्रपती संभाजीनगर येथे २०२६ चा लोकमत बीड भूमिपुत्र पुरस्कार सोहळा संपन्न*   *नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड व जेष्ठ नेते डॉ. हारुणभाई इनामदार  बीड भुमिपुत्र पुरस्काराने सन्मानित* appeared first on जनसंवाद न्यूज.

प्रमाणित लेखा परिक्षक श्री.सी.ए.खोडसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
केज/ प्रतिनिधी

श्री.सी.ए.खोडसे प्रमाणित लेखा परिक्षक सहकारी संस्था बीड तथा प्रशिक्षक सहकारी संस्था यांचा वाढदिवस दि.७ जुलै २०२६ रोजी मंगळवारी उत्साहात संपन्न झाला.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यामध्येप्रामुख्याने बीड जिल्ह्याचे खासदार श्री.बजरंग बप्पा सोनवणे,स्विय सहाय्यक श्री.विजय अंजान व श्री

सुरज खोडसे,मा.आ. पृथ्वीराज साठे,केज तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री.प्रवीण खोडसे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अंकुश अण्णा इंगळे,छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी दादा ठोंबरे, दै.झुंजार नेताचे केज तालुका प्रतिनिधी श्रावण कुमार जाधव,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज तथा दैनिक समर्थ राजयोगचे तालुका प्रतिनिधी चंद्रकांत पाटील,मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था केज श्री.नेहरकर साहेब, श्रीमती.वहावळे मॅडम ओ.एस.सहाय्यक निबंधक केज,श्री.विशाल इंगळे सहाय्यक सलग्न अधिकारी,माजी सहाय्यक निबंधक ओ.एस.शिंदे साहेब, संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हाध्यक्ष श्री.राहुल खोडसे,श्री.अमोल रूपदास विमा प्रतिनिधी, श्री.बालाजी शितोळे,श्री. विजयकुमार घुटे,बीड जिल्हा कार्याध्यक्ष पूर्व विभाग,मराठा सेवा संघ गोविंद नाना शिनगारे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन करुन स्वागत केले. श्री.सी.ए.खोडसे हे प्रमाणित लेखा परिक्षक व सहकार क्षेत्रात प्रशिक्षण देण्याचे कार्य अविरतपणे करत आहेत. सहकार क्षेत्रातील होणारे बदल व सुधारणा या बाबत ते सहकारी पतसंस्था,सोसायटी यांना प्रशिक्षण शिबीरात

मार्गदर्शन करतात. विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.सत्काराला उत्तर देताना श्री.सी.ए. खोडसे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की,माणसाने आयुष्यात किती पैसे कमावले यापेक्षा त्याने त्याच्या आयुष्यात माणुसकी किती जोपासली,इतरांशी वागतो कसा,स्वभाव, व्यवहार यामुळे कोणताही व्यक्ती अधिक माणसाने माणुसकीने जोडला जातो याची प्रचिती मला आज आली मी माझ्या आयुष्यामध्ये पैसे कमावले नसले तरी तुमच्यासारखे मौल्यवान सोन्यासारखे माणसे नेहमी स्नेहरुपी आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत,यामुळेच मी माझ्या यशस्वी आयुष्यरुपी प्रवासात इथपर्यंत आलेलो आहे. मी माझ्या आयुष्याची सुरुवात खूप खडतर परिस्थितीतून झालेली आहे आणि अनेक अडचणी,संघर्ष आणि आव्हाने पेलत स्वतःच्या मेहनतीवर,जिद्दीवर आणि आत्मविश्वासाने या यशस्वी प्रवासात आहे.मी परिस्थितीने कधीच थांबलो नाही उलट प्रत्येक संकटांनी मला अधिक सक्षम, अधिक परिपक्व आणि अधिक कर्तुत्वान बनवले.या यशस्वी प्रवासात तुमच्यासारख्या व्यक्तींचे शुभाशीर्वाद लाभले.माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सर्व क्षेत्रातील मान्यवर, शैक्षणिक,सामाजिक व गुरुवर्य,मित्र परिवारांनी दिलेल्या अमूल्य शुभेच्छा व शुभाशीर्वादाचा मना पासून स्वीकार करतो व सोबत गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडून झाल्या असतील किंवा नकळत कोणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल मी सर्वप्रथम क्षमा मागतो,तुम्हा सर्वांचे असेच स्नेह,कृपा, आशीर्वाद कायम ऋणानुबंध राहो हीच साई चरणी प्रार्थना व सदिच्छा व्यक्त करतो पुनश्च सर्व साई परिवारातील नातेवाईक, मान्यवरांचे,मित्र परिवारांचे मनापासून खूप खूप आभार व धन्यवाद अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

The post प्रमाणित लेखा परिक्षक श्री.सी.ए.खोडसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव appeared first on जनसंवाद न्यूज.

भर पावसामध्ये गटनेते हारूणभाई इनामदार यांनी शहरातील विविध भागांची केली पाहणी
नगर पंचायतच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना नाले व गटारींची नियमित स्वच्छता करण्याच्या दिल्या

केज/प्रतिनिधी

केज शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गट नेते हारूणभाई इनामदार यांनी भर पावसात शहरातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्ते, नाले, गटारी तसेच स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पाहणीदरम्यान हारूणभाई इनामदार यांनी नगर पंचायतच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना नाले व गटारींची नियमित स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. पावसाचे पाणी साचणार नाही, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही आणि स्वच्छतेची कामे वेळेत पूर्ण होतील, याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, तसेच शहरातील व्यापारी व नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन हारूणभाई इनामदार यांनी केले. भर पावसात शहराची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. स्वतः ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांनी भर पावसात शहरातील विविध भागात जाऊन पाहणी करून व्यापारी व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे कर्मचाऱ्यांना सूचना दिल्याबद्दल नागरिकांतून त्यांचे समाधान व्यक्त केले जात आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार, मुकादम भीमा शिंदे, आसेफ इनामदार, पठाण साहेब, मुफसील शेख, सज्जाद इनामदार, बापू कापरे यांच्यासह नगरपंचायत चे कर्मचारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

The post भर पावसामध्ये गटनेते हारूणभाई इनामदार यांनी शहरातील विविध भागांची केली पाहणी appeared first on जनसंवाद न्यूज.

​खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी केज तालुक्यात तीव्र संताप;
खासदारकी रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी!

​केज तालुका पत्रकार संघाचे नायब तहसीलदारांना निवेदन; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

केज/ प्रतिनिधी

शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी कर्तव्य बजावणाऱ्या आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना अत्यंत अश्लील (अर्वाच्य) भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद केज तालुक्यात उमटले असून, केज तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

​याप्रकरणी खासदारांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्यांची खासदारकी कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी केज तालुका पत्रकार संघाच्या वतीने नायब तहसीलदार हांगे साहेब यांना निवेदन देण्यात आले.

​तहसील परिसर घोषणांनी दणाणला

​निवेदन देण्यासाठी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी खासदारांच्या दडपशाही आणि अरेरावीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पत्रकारांच्या घोषणांनी संपूर्ण तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर अशा प्रकारे हल्ला करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा सर्वच स्तरांतून धिक्कार केला जात आहे.

​तीव्र आंदोलनाचा इशारा

​पत्रकार संघाने निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीत प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे. मात्र, खासदार संजय दिना पाटील यांनी ज्या प्रकारे पत्रकारांना धमकावले आहे, ते अत्यंत निंदनीय आहे. प्रशासनाने यावर तात्काळ कठोर कार्यवाही करावी. जर या प्रकरणी तात्काळ योग्य ती पावले उचलली गेली नाहीत, तर केज तालुक्यातील सर्व पत्रकार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

​प्रतिलिपी रवाना:

या निवेदनाच्या प्रतिलिपी पुढील योग्य कार्यवाहीसाठी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री आणि मा. जिल्हाधिकारी (बीड) यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत.

​प्रमुख पत्रकारांची उपस्थिती

​निवेदन देतेवेळी केज तालुक्यातील ज्येष्ठ आणि प्रमुख पत्रकार उपस्थित होते. या निवेदनावर प्रकाश एकनाथ मुंडे, गौतम बचुटे, श्रावण कुमार जाधव, विजय आरकडे, महादेव गायकवाड, संतोष गालफाडे, रामदास साबळे, हनुमंतराव सौदागर, तात्या गवळी, दिनकर जाधव, चंद्रकांत पाटील, वसंतराव सोनवणे, रणजीत तात्याराम घाडगे, प्रदीप काशिनाथ गायकवाड, अशोक बापू सोनवणे, अजय महादेव भांगे आणि पांडुरंग कसबे यांच्या सह्या आहेत.

​निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदार हांगे साहेब यांच्यासोबत एलसीबी (LCB) विभागाचे कागदे साहेब देखील उपस्थित होते. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात पत्रकारांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

The post ​खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी केज तालुक्यात तीव्र संताप; appeared first on जनसंवाद न्यूज.