Homeउद्योगयेडेश्वरी साखर कारखान्याची ऊस गाळपात दमदार कामगिरी

येडेश्वरी साखर कारखान्याची ऊस गाळपात दमदार कामगिरी

५४ दिवसांत ४ लाख मे.टन ऊस गाळप पूर्ण, खा.बजरंग सोनवणेंची माहिती

केज: येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं.१, आनंदगाव (ता. केज) येथे सन २०२५-२६ या चालू गळीत हंगामात अवघ्या ५४ दिवसांत तब्बल ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. कारखान्याचा बारावा गळीत हंगाम सध्या पूर्ण क्षमतेने सुरू असून, नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे गाळपाचे उद्दिष्ट वेगाने साध्य होत आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन खा.बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.

दररोज सरासरी सुमारे ९ हजार टन ऊस गाळप होत असून, शेतकऱ्यांच्या ऊसाला वेळेवर आणि अडथळेविना गाळप मिळत असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गळीत हंगामाच्या सुरुवातीपासूनच काटेकोर नियोजन, यंत्रसामग्रीची तत्पर देखभाल आणि कामगारांचे नियोजन यामुळे गाळपाचा वेग कायम ठेवण्यात कारखाना प्रशासनाला यश आले आहे. ऊस गाळपाबरोबरच कारखान्यांतर्गत कार्यरत असलेला २६ मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्पही प्रभावीपणे सुरू आहे. आजअखेर या प्रकल्पातून एकूण १ कोटी ९३ लाख ६४ हजार २०० युनिट वीज निर्मिती करण्यात आली असून, त्यापैकी ७२ लाख ५४ हजार ९०० युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात (एक्सपोर्ट) करण्यात आली आहे. त्यामुळे कारखान्याला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला असून, ऊर्जानिर्मिती क्षेत्रातही येडेश्वरी साखर कारखान्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. कारखान्याच्या कार्यक्षम व दूरदृष्टीपूर्ण व्यवस्थापनामुळे गाळप आणि वीज निर्मिती या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती होत आहे. याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. आगामी काळातही अशीच कामगिरी कायम राखत शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करण्याचा संकल्प कारखाना प्रशासनाने व्यक्त केला आहे.
००
डिस्टिलरीत मोठी झेप
डिस्टिलरी विभागाकडील गळीत हंगाम २०२५-२६ चे प्रत्यक्ष उत्पादन दि.५ नोव्हेंबर २०२५ रोजी चालू होऊन २८३६४ मे.टन सिरप पासून ७९,९७,२०४ ब.ली.आर.एस.चे उत्पादन झालेले आहे. तसेच ५८३४ मे.टन बी हेवी पासून १६,९६,९४० ब.ली.आर.एस असे एकूण आर.एस.९६,९४,१४४ चे उत्पादन झाले आहे. सदर उत्पादित सिरप आर.एस.पासून ६३,८९,९३२ ब.ली.इथेनॉल व बी हेवी आर.एस.पासून २,७४,६०८ इथेनॉल असे एकूण ६६,६४,५४० ब.ली.चे उत्पादन झाले आहे. उर्वरित आर.एस.२६,९६,३७७ लाख लिटर आर.एस.साठा शिल्लक आहे. उत्पादित झालेल्या इथेनॉल पैकी ४९,९५,००० ब.ली.ची ऑईल कंपनीना विक्री झालेली असून आज उर्वरित १६,६९,५४० ब.ली. इथेनॉल शिल्लक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!