Homeमहाराष्ट्रनिकृष्ट व जुनी ज्वारी वाटपाचा गंभीर प्रकार; आझाद क्रांती सेनेद्वारे ६ जानेवारीला...

निकृष्ट व जुनी ज्वारी वाटपाचा गंभीर प्रकार; आझाद क्रांती सेनेद्वारे ६ जानेवारीला केज तहसील कार्यालयासमोर रस्ता रोकोचा इशारा

केज/प्रतिनिधी:-
केज शहर व तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गेल्या तीन महिन्यांपासून गोरगरीब नागरिकांना जुनी, किड लागलेली व पीठ झालेले धान्य (ज्वारी) वाटप करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात आझाद क्रांती सेनेच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयास, तहसीलदार केज मार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्वस्त धान्य दुकानांवरून वितरित केली जाणारी ज्वारी अत्यंत निकृष्ट दर्जाची असून त्यात किड, दुर्गंधी व पीठाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अशी ज्वारी मानवाच्या आरोग्यास अपायकारक असून ती खाण्यास अयोग्य आहे. तरीसुद्धा ही ज्वारी गोरगरीब जनतेला जबरदस्तीने दिली जात असल्याने शासनाकडूनच गरीब जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“गोरगरीब नागरिकांकडे पर्याय नसल्याने ही ज्वारी स्वीकारावी लागत आहे. परंतु या ज्वारीमुळे आजारपण वाढण्याची दाट शक्यता असून हे थेट जनतेच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे,” असे निवेदनात नमूद आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन निकृष्ट ज्वारीचा पुरवठा बंद करावा तसेच आतापर्यंत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वाटप झालेली ज्वारी परत घ्यावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच माननीय जिल्हाधिकारी यांनी दिनांक ५ जानेवारी २०२६ पर्यंत याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी केज तहसील कार्यालयासमोर, शिवाजी चौक केज येथे तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आझाद क्रांती सेनेच्या माध्यमातून शरद थोरात (तालुका प्रमुख केज) यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनाची माहिती माननीय उपजिल्हाधिकारी (अंबाजोगाई), माननीय तहसीलदार (केज) तसेच तालुका पुरवठा अधिकारी केज यांनाही देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे केज तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून चांगल्या प्रतीची ज्वारी पुरवठा करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!