Homeमहाराष्ट्रउशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात पंचायत समितीत खुर्चीला हार

उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात पंचायत समितीत खुर्चीला हार

वंचित बहुजन आघाडी आक्रमक; उशिरा येणे, गैरहजेरी आणि सही करून पलायन

केज:प्रतिनिधी
केज पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अनियमित उपस्थितीविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, कार्यालयातील गैरशिस्तीचा निषेध म्हणून अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पंचायत समितीतील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले अनेक कर्मचारी नियमित वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. काही कर्मचारी सातत्याने उशिरा येतात, तर काही पूर्णतः गैरहजर राहत असल्याचे प्रकार घडत आहेत. तसेच काही कर्मचारी फक्त एकदाच येऊन हजेरी रजिस्टरवर सही करून उपस्थिती दाखवून पुन्हा कार्यालयातून निघून जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
या प्रकारामुळे पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सामान्य नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय कार्यालयातील शिस्त, वेळेचे पालन व जबाबदारी यावर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या अनियमिततेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यावेळी अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदवण्यात आला. पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभागांमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सक्तीने लागू करावी, बायोमेट्रिकशिवाय कोणतीही उपस्थिती ग्राह्य धरू नये, वेळेचे पालन न करणाऱ्या व गैरहजर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच गटविकास अधिकारी यांचे ड्युटी शेड्युल कार्यालयाबाहेर वारानुसार प्रदर्शित करावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, सदर मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!