Homeमनोरंजन*संगीत साधना मंच अंबाजोगाई ची 24 वी मासिक संगीत सभा श्री हरीश...

*संगीत साधना मंच अंबाजोगाई ची 24 वी मासिक संगीत सभा श्री हरीश कुलकर्णी( लातूर) यांच्या बहारदार गायनाने संपन्न*

प्रतिनिधी- तुकाराम सुवर्णकार
दि. 22/ 2/2026 वार रविवार संगीत साधना मंच व मातृस्वर संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई येथील आदर्श वसाहत भागातील कपिल गणेश मंदिरात 24 वी मासिक शास्त्रीय संगीत सभा श्री हरीश कुलकर्णी ( लातूर) यांच्या बहारदार गायनाने संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलना ने व सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पणकरून झाली. त्यानंतर बालगंधर्व संगीत विद्यालयातील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार प्रमुख कलावंतांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली लातूर येथील प्रसिद्ध कलावंत श्री हरीश कुलकर्णी यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग-पुरिया कल्याण रागातील डॉ सुहासिनी कोरटकर यांनी बांधलेल्या ” शारदे दयानी विद्यादानी नादब्रह्म विहारीनी ” या विलंबित एकतालातील बंदीशीने केली विलंबित लय व संथ आलापिं व रागावरील पकड यामुळे वातावरण तयार झाले. त्यानंतर याच रागातील खयाल नुमा तारांना
“तोम तनन देरेना तदाणी” हा सादर करत सरगम व विविध प्रकारच्या तानांनी वातावरण बहरून आले. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्यातील पारंपारिक बंदिश “सावरिया मग रोकत निसदिन “या तीनतालातील बंदिशीने रासिकांची मने जिंकली.. त्यानंतर दुर्गा रागातील “माता भवानी काली दुर्गा गौरी” या तीनतालातील बंदीश श्री हरीश कुलकर्णी यांनी सादर केली बोलबाट, सरगम व अलापी याने रागाचे बढत करत. उत्तम सादरीकरण केले नंतर एकतालातील भेंडीबझार घराण्यातील प्रसिद्ध बंदिश “अत सोहत चंद्र बदन” ही बंदिश व नंतर याचं रागातील तराना सादर करून रसिकाची दाद मिळविली.कार्यक्रमाच्या शेवटी “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल” या संत तुकाराम महाराजांचे अभंगांनी या मैफिलीची सांगता झाली. यांना तबल्याची साथसंगत श्री जयप्रकाश हरिदास, हार्मोनियमची साथ श्री विश्वजीत धाट व पखवाजाची साथ श्री बंकटकुमार बैरागी यांनी केली.या कार्यक्रमासाठी अंबाजोगाईतील जेष्ठ -श्रेष्ठ कलाकार,जानकार रसिक श्रोते पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!