Homeमहाराष्ट्र१ मार्च रोजी केज येथे पत्रकार संघाच्या वतीने भव्य सांस्कृतिक सोहळा व...

१ मार्च रोजी केज येथे पत्रकार संघाच्या वतीने भव्य सांस्कृतिक सोहळा व गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम,

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व विविध पत्रकार संघटनांचा संयुक्त उपक्रम; मान्यवरांच्या उपस्थितीत होणार विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान

केज/प्रतिनिधी

केज शहरातील पंचायत समिती मैदान,शिक्षक पतपेढी केज येथे दि.०१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई,राष्ट्रीय पत्रकार संघ केज,पुरोगामी पत्रकार संघ तसेच सह्याद्री पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडणार असून,विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात येणारआहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हारुणभाई इनामदार हे राहणार असून उद्घाटन डॉ.सौ.सिताताई बनसोड यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून बीड लोकसभा खासदार मा.श्री.बजरंग (बप्पा) सोनवणे,राज्यसभेच्या खासदार मा.सौ. रजनीताई पाटील तसेच केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार मा. सौ.नमिता अक्षय मुंदडा यांची उपस्थिती लाभणार आहे.याशिवाय शिवसेना पक्षाच्या उपनेत्या मा.प्रा. सौ.संगिताताई ठोंबरे, ज्येष्ठ नेते मा.श्री. रमेशराव आडसकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अंजलीताई घाडगे यांच्यासह विविध राजकीय,सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.मा.श्री. राकेश गिड्डे,मा.श्री.सागर पठाडे,मा.डॉ.अशोक थोरात,मा.श्री.संतोष हंगे, मा.श्री.राहुल सोनवणे, मा.श्री.भाई मोहन गुंड, मा.श्री.शंकर जाधव,मा. श्री.आदित्यदादा पाटील आदींसह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती सोहळ्याला लाभणार आहे.या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रदान करण्यात येणारे गौरव पुरस्कार. उत्कृष्ट नगराध्यक्षा गौरव पुरस्कार डॉ.सौ.सिताताई बनसोड,केज भूषण गौरव पुरस्कार डॉ. हारुणभाई चाॕंदपाशा इनामदार,आदर्श डॉक्टर गौरव पुरस्कार डॉ. बालासाहेब अस्वले, अष्टपैलू समाज गौरव पुरस्कार हनुमंत भौसले सर यांना प्रदान करण्यात येणार आहे.तसेच उत्कृष्ट नगरसेवक गौरवपुरस्कार राजुभाई इनामदार,पैंथर भूषण गौरव पुरस्कार दिपक कांबळे,क्रीडा प्रशिक्षक गौरव पुरस्कार विनोद गुंड,उत्कृष्ट अभिनेता गौरव पुरस्कार प्रजेनजिन राहुल गायकवाड,उत्कृष्ट अधिपरीचारीका गौरव पुरस्कार ज्योती विलास आरखडे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
प्रशासकीय व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची दखल घेत उत्कृष्ट प्रशासकीय सेवा गौरव पुरस्कार श्री.राकेश गिड्डे साहेब,पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार धनंजय कुलकर्णी,उत्कृष्ट पत्रकारिता गौरवपुरस्कार संतोष गालफाडे, पत्रकारिता संघर्ष गौरव पुरस्कार महादेव गायकवाड,निर्भीड पत्रकारिता गौरवपुरस्कार गौतम बचुटे यांना देण्यात येणार आहेत.शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असून आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार प्रा.धनराज भालेराव,उत्कृष्ट सामाजिक कार्य गौरव पुरस्कार अरविंद थोरात, उत्कृष्ट युवा उद्योजक गौरव पुरस्कार महेश तपसे तसेच समाजसेवक गौरव पुरस्कार महादेव कराड वृद्धाश्रम यांना प्रदान केला जाणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रंगतदार सादरीकरणासह हा सोहळा केज तालुक्या साठी प्रेरणादायी ठरणार आहे.विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचा सन्मान करून समाजातील सकारात्मक कार्याला चालना देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन
पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

केज येथे प्रा.माणिकराव आनंदगावकर यांच्या ‘गोडवा’ हायकू काव्य संग्रहाचे थाटात प्रकाशन

गोडवा'काव्यसंग्रहातून घडते सामाजिकतेचे दर्शन,अल्पाक्षरी हायकू प्रकारातून समाज मनाचा वेध घेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न - डॉ.दीपकराव कासराळीकर केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र,सेवानिवृत्त प्राध्यापक आणि कवी माणिकराव आनंदगावकर...

error: Content is protected !!