केज/प्रतिनिधी
दैनिक लोकमत परिवाराच्या वतीने देण्यात येणारा लोकमत बीड भुमिपुत्र २०२६ चा पुरस्कार हा नुकताच बीड जिल्ह्यात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना जाहिर करण्यात आला होता. या पुरस्काराचे वितरण सोमवार रोजी छत्रपती संभाजी नगर येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये केज शहरासह तालुक्यातून केजच्या प्रथम नागरिक तथा केजच्या नगराध्यक्षा डॉ.सीताताई बनसोड व राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केज नगरपंचायतचे गटनेते डॉ.हारूणभाई इनामदार, केज पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ.सरोजनी दादासाहेब ससाने व बीड येथून दैनिक मराठवाडा दर्शनचे संपादक दत्तात्रय हंडीबाग यांना दैनिक लोकमत परिवाराच्या वतीने २०२६ च्या बीड भूमिपुत्र पुरस्कार या पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉ.हारुणभाई इनामदार हे गेल्या ३० ते ३५ वर्षापासून सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. इनामदार यांच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना दैनिक लोकमत परिवाराच्या वतीने २०२६ चा लोकमत बीड भूमिपुत्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच केज नगरीच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात ही रमाई महिला विकास संस्थेच्या माध्यमातून सुरू झाली. त्यांनी मागील २५ ते ३० वर्षांमध्ये सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले असून नगराध्यक्षा डॉ. सौ.सीताताई बनसोड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांनाही लोकमत बीड भूमिपुत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक १३ जुलै २०२६ रोजी फर्न रेसिडेन्सी येथे दुपारी ४-३० वाजता माजी केंद्रीयमंत्री डॉ. भागवतराव कराड, सिनेअभिनेते अशोक शिंदे यांच्यासह लोकमत समूहाचे प्रमुख मार्गदर्शक, मान्यवरांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ मान्यवरांना लोकमत बीड भूमिपुत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व दैनिक लोकमत समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप शेवटी स्नेह भोजनाने करण्यात आला.
























