Homeताज्या बातम्याकेज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय, ३० हजार रुपयाच्या दंडाचीही शिक्षा

केज/प्रतिनिधी

केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवार दि.१७ जुलै रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्याला ३० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.दि.२३एप्रिल २०२४रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास केज येथील वसंत विद्यालया जवळील क्रांतीनगर परिसरात गोरख महावीर हजारे वय १८ वर्षे आणि अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता.यावेळी आरोपीने गोरख हजारे याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
त्यानंतर काही वेळाने अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे याने शर्टमध्ये लपवून ठेवलेल्या धारदार शस्त्राने गोरख हजारे यांच्या गळ्यावर वार केले होते.या हल्ल्यात गंभीरजखमी झालेल्या गोरख हजारे यांना नातेवाईकांनी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारा पूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या प्रकरणी मयत गोरख हजारे यांचे नातेवाईक राज संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.तत्कालीन
पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
या प्रकरणाची सुनावणी केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले आणि आर. के.शेख यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले.फिर्यादीची साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पुरावे तसेच सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले.सहाय्यक सरकारी वकील अॕड. राम बिरंगळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे रा. क्रांतीनगर,केज याला जन्मठेप आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्यात सहाय्यक सरकारी वकील अॕड. राम बी.बिरंगळ यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.त्यांना सहाय्यक सरकारी वकील अॕड.रविकुमार उदार आणि पैरवी पोलीस कर्मचारी रमा भालेराव यांनी सहकार्य केले.

चौकट

आरोपीला शेतातून घेतले होते ताब्यात

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे याला बोबडेवाडी येथील शेतातून ताब्यात घेतले होते.या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक चेतनातिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना,पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन,पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,आनंद शिंदे, वैभव सारंग तसेच पोलीस कर्मचारी श्रीकांत चौधरी, रुक्मिणी पाचपिंडे, बाळासाहेब अहंकारे, संतोष गित्ते,सचिन अहंकारे,शेख मतीन, प्रकाश मुंडे आणि चालक संभुदेव दराडे यांनी सहभाग घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!