Homeमहाराष्ट्रआ. नमिता मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यालय उमरी येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर...

आ. नमिता मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यालय उमरी येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमलले हास्य

केज / प्रतिनिधी

​केज मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मूकबधिर निवासी विद्यालय, उमरी येथे भारतीय जनता पार्टी व सोनू सावंत यांच्यातर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करून अत्यंत उत्साहात आणि माणुसकीच्या नात्याने हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
​आमदार मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ हार-तुरे न स्वीकारता समाजोपयोगी उपक्रम राबवण्याच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि इतर शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
​या मान्यवरांची होती उपस्थिती:
या स्तुत्य उपक्रमावेळी केज तालुका अध्यक्ष भगवान केदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर, युवा नेते सोनू भैय्या सावंत, पत्रकार प्रकाश मुंडे, विक्रम डोईफोडे, विकास जाधव, अशोक मुळे, नाना मुळे, कृष्णा मुळे, बालासाहेब मुळे आणि गणेश मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
​मार्कंड्य विचार आणि कृतज्ञता:
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर यांनी आमदार नमिता मुंदडा यांच्या कार्याचा गौरव केला. मतदारसंघाच्या विकासासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासण्यात त्या नेहमीच अग्रेसर असतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार जाधव मॅडम व सूर्यवंशी मॅडम यांनी मानले.
​याप्रसंगी मुक बधीर निवासी विद्यालय उमरी येथील शिक्षक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!