Homeमहत्त्वाचेविद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व व्यापाऱ्यांचा सहभाग

केज:प्रतिनिधी
नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार गुरुवारी दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने केज शहरात शांततेत बंद पाळण्यात आला. या बंदला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
बंदची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, केज येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर जय भीम, जय संविधान अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शहरातून शांततेत रॅली काढण्यात आली. रॅली तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर बलप्रयोग करणे हा भारतीय लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर आघात असून या घटनेची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य कराव्यात, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची शासनाने हमी द्यावी तसेच संपूर्ण घटनेची नैतिक व राजकीय जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनीही राजीनामा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस भाई गुंड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राहुल खोडसे, बहुजन विकास मोर्चाचे तालुकाध्यक्ष लखन हजारे तसेच ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष समाधान बचुटे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला.यावेळी प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाचा तीव्र निषेध व्यक्त करत लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न अस्वीकार्य असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
केज शहरातील व्यापाऱ्यांनीही बंदला चांगला प्रतिसाद दिला. संपूर्ण आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के, लिंबराज गायकवाड, रज्जाक शेख, धनराज सोनवणे,अमोल हजारे,शरद धिवार,प्रवीण मस्के, उमेश कांबळे, अनंत शिनगारे, प्रदीप गायकवाड, लक्ष्मण ओव्हाळ, सतीश बनसोडे, यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, महिला-पुरुष कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड व जेष्ठ नेते डॉ. हारुणभाई इनामदार बीड भुमिपुत्र पुरस्काराने...

केज/प्रतिनिधी दैनिक लोकमत परिवाराच्या वतीने देण्यात येणारा लोकमत बीड भुमिपुत्र २०२६ चा पुरस्कार हा नुकताच बीड जिल्ह्यात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना जाहिर करण्यात...

error: Content is protected !!