केज प्रतिनिधी
केज येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नुकतेच रुजू झालेले व्यंकट राम यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी बोलताना दणकावून सांगितले अवैध धंदे करणाऱ्यांना सज्जड दम दिला असून कार्यक्षेत्रात मटका गुटखा हातभट्टी दारू जुगार गांजा बनावट दारू वेश्याव्यवसाय भूमाफिया गुंडागर्दी करणारे गुन्हेगार तसेच रोड रोमिओ वीट भट्टी व इतर ठिकाणी बालकामगार दिसून आल्यास जेलची हवा खावी लागणार आहे.
यापूर्वी कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या कार्य काळामध्ये अवैध धंदे करणाऱ्यांनी जबर धास्ती घेतली होती परंतु त्यांच्या बदलीनंतर अवैध धंद्यांना मोकळे रान मिळाले होते त्यामुळे आमचे कोणीही काहीही करू शकत नाही अशा भावामध्ये राजरोसपणे अवैध धंदे चालवत होते आणि सर्वसामान्यां जनतेचे संसार देशोधडीला लावले आहेत या पुढील काळामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकट राम यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकारी आल्याने अवैध धंद्यांना चपराक बसणार असून त्यांचे धाबे दणाणले आहेत.





















