Homeमहाराष्ट्रकेजच्या जय भवानी चौकात वाहतूक कोंडी; पोलिसांचा मागमूस नाही – नागरिकांनीच केली...

केजच्या जय भवानी चौकात वाहतूक कोंडी; पोलिसांचा मागमूस नाही – नागरिकांनीच केली वाहतूक सुरळीत!

केज शहरातील जय भवानी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. ऐन दिवाळीच्या सणामुळे शहरात वाढलेल्या वाहतुकीचा ताण नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू लागला. मात्र या ठिकाणी वाहतूक नियोजनासाठी पोलिसांचा कुठेही मागमूस नव्हता, हे विशेष लक्षवेधी ठरले.
वाहतूक कोंडी वाढत गेल्याने स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वतःच वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पत्रकारांनी केज पोलिस ठाण्याचे निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना परिस्थितीची माहिती देण्यासाठी संपर्क साधला असता, त्यांनी “आमच्याकडे ८५ पोलिस स्टेशन आहेत, तुम्ही ट्रॅफिक विभागाच्या नंबरवर कॉल करत जा,” अशी उदासीन प्रतिक्रिया दिली. या उत्तरामुळे पत्रकार आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला असून, “पोलिसांना मदतीसाठी फोन करावा की नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
घटनेनंतर काही वेळाने ट्रॅफिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत नागरिकांनीच कोंडी कमी करून रस्ता मोकळा केला होता. जय भवानी चौक हा केज शहराचा मध्यबिंदू असून येथून तीन प्रमुख मार्ग – बीड, परळी आणि धारूर दिशेने जातात. त्यामुळे या ठिकाणी दिवसभर मोठी रहदारी असते.
सणासुदीच्या काळात वाहतूक व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यायला हवे होते, अशी नागरिकांची मागणी आहे. स्थानिक व्यापारी, नागरिक आणि वाहनधारकांनी वाहतूक विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पोलिस प्रशासनाने तत्काळ आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!