Homeमहाराष्ट्रअखेर केज पंचायत समितीला केज संघर्ष समिती ने कुलूप ठोकले !

अखेर केज पंचायत समितीला केज संघर्ष समिती ने कुलूप ठोकले !

केज : प्रतिनिधी
पंचायत समिती च्या प्रांगणात सभापती, अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या चार मजली दोन व इतर दोन अशा चार भव्य इमारती गेली तीन वर्षापासून केवळ वीजफिटिंग व जोडणी अभावी धूळ खात पडल्या आहेत. सध्या शासनाच्या दुर्लक्षामुळे या इमारती गुन्हेगारी व अवैध बाबींच्या अड्डे बनल्या आहेत.या इमारती प्रशासनाने तात्काळ संबंधित गुत्तेदाराकडून वीजपुरवठा काम पूर्ण व पंचायत समितीकडे हस्तांतरित करून अधिकारी व कर्मचारी यांना राहण्यासाठी राहण्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीने मंगळवारी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप ठोकले.
केज पंचायत समितीच्या जागेत सभापती, अधिकारी व कर्मचारी यांना राहण्यासाठी प्रचंड खर्च करून गेली तीन वर्षापासून भव्य व सुसज्ज इमारती बांधल्या गेल्या. बांधकाम ही वेळेत पार पडले. मात्र त्यानंतर वीज फिटिंग व जोडणी चे काम वेळेत पूर्ण न होऊ शकल्याने या इमारती गेली तीन वर्षापासून बेवारस अवस्थेत धूळ खात पडल्या आहेत. केवळ वीज फिटिंग काम न झाल्याने या इमारती केज पंचायत समितीकडे हस्तांतरित होऊ शकल्या नाहीत. मध्यंतरीच्या काळात या इमारतीकडे कोणाचेही लक्ष न राहिल्याने अज्ञात, टुकार व गुन्हेगारी टोळक्यांनी या इमारतीचा आश्रय घेवून सिगारेट, दारू पिणे, जुगार यासह इतर अवैध धंद्यासाठी या इमारतींचा वापर सुरू केला. या सर्व इमारतींच्या खिडक्यांचा काचा व कांहीं दरवाजेही तोडफोड करण्यात आली. गेली तीन वर्षात या इमारतींचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहे. शासकीय संपतीकडे अधिकारी व कर्मचारी किती बेफिकीर वृत्तीने वागतात हे यावरून सिद्ध झाले आहे. स्वतःच्या पैशातून उभा केलेल्या इमारतीकडे असे कोणी पाहिले असते का? एवढी वर्षे जबाबदार अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर माहिती पाठवून पाठपुरावा केला असता तर हे काम खूप लवकर पूर्ण होऊन जनतेच्या पैशाचा हा अपव्यय व नुकसान टाळता आले असते.
केज विकास संघर्ष समिती गेली तीन वर्षे यासाठी पाठपुरावा करून या इमारती तात्काळ राहण्यासाठी उपलब्ध करून देण्याची वेगवेगळ्या निवेदने व आंदोलनाद्वारे करत आहे.
याही वेळी समितीने प्रशासनाकडे रीतसर निवेदन देऊन मागणी केली होती. मात्र प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने समितीने मंगळवारी केज पंचायत समितीच्या मुख्य प्रवेश द्वाराला कुलूप ठोकले. अखेर केज पंचायत समिती प्रशासनाने येत्या 31 डिसेंबर पूर्वी या इमारतीचे प्रलंबित काम पूर्ण करून राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात समितीचे समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे सहभागी होते. निवेदनावर हनुमंत भोसले , नासेर मुंडे, शेषराव घोरपडे, महेश जाजू , यांच्या स्वाक्षरी आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!