Homeमहाराष्ट्रयुवा श्रमिकांच्या हक्कां साठी भारतीय जनता मजदुर संघाचा मोठा पुढाकार,शांत प्रकाशजी जाटव,रौशन...

युवा श्रमिकांच्या हक्कां साठी भारतीय जनता मजदुर संघाचा मोठा पुढाकार,शांत प्रकाशजी जाटव,रौशन कुमारजी, चरणसिंहजी यांचे नेतृत्व सक्षम – भाऊसाहेब घोडके

केज/प्रतिनिधी

देशभरातील युवा श्रमिकां साठी समान वेतन, वेळेवर पगार,सुरक्षित कार्यस्थळ,सामाजिक सुरक्षा आणि नोकरीच्या सुरुवातीला अनिवार्य नियुक्तीपत्र (Appointment Letter) मिळावे,यासाठी भारतीय जनता मजदूर संघाने मोठी मोहीम सुरू केली आहे.राष्ट्रीय अध्यक्ष शांतप्रकाशजी जाटव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सचिव रौशन कुमारजी,राष्ट्रीय महासचिव चरण सिंहजी यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाला गती मिळत आहे.दिल्लीतुन झालेल्या ऑनलाईन महत्त्वपूर्ण चर्चासत्रात युवा श्रमिकांच्या हक्कांवर, रोजगारातील पारदर्शकते वर आणि भविष्याच्या सुरक्षेवर व्यापक चर्चा झाली.यावेळी युवा मोर्चा, मंडल दिल्ली प्रदेशचे उपाध्यक्ष तसेच बीजेएमएस सोशल मीडिया आणि डिजिटल क्रिएटर्स बोर्डचे राष्ट्रीय सचिव रौशन कुमारजी यांनी युवा श्रमिकांच्या समस्यांवर प्रकाश टाकत संघटनेच्या उपक्रमांची माहिती दिली.या प्रसंगी भारतीय जनता मजदूर संघाचे राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब घोडके यांनी युवा संघटनांना मार्गदर्शन केले.महाराष्ट्रासह विविध राज्यांत युवकांना संघटित करून त्यांना सक्षम करण्याचे कार्य ते सातत्याने करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.तसेच महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय कुलकर्णी,मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील हे ही युवकांना संघटित करण्याचे कार्य सक्रियपणे करीत असल्याचा उल्लेख करण्यात आला.बैठकीत भोपालसह अनेक भागांत युवा वर्गासाठी कौशल्य विकास,डिजिटल प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीच्या नव्या संधी बाबतही सविस्तर चर्चा झाली.केंद्रातील मोदी सरकारने आधीच ‘स्किल इंडिया’,‘स्टार्ट-अपइंडिया’, ‘मेक इन इंडिया’, ‘ई-श्रम कार्ड योजना’ आणि विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून युवा व श्रमिकांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.त्याच धर्तीवर बीजेएमएसच्या वतीने ही श्रमिकांचे हक्क,सन्मान आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र करण्यात येत आहेत.युवकांच्या भूमिकेवर बोलताना रौशन कुमार म्हणाले की,
“युवा सुरक्षित व सशक्त असेल,तेव्हाच देशाचे भविष्य भक्कम होईल. प्रत्येक श्रमिकाला त्याचा हक्क,सन्मान आणि सुरक्षा मिळाली पाहिजे.”
या संपूर्ण चर्चेच्या माध्यमा तून युवा श्रमिकांसाठी नव्या आशा,नव्या संधी आणि सकारात्मक बदलांच्या युगाची सुरूवात होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

केज येथे प्रा.माणिकराव आनंदगावकर यांच्या ‘गोडवा’ हायकू काव्य संग्रहाचे थाटात प्रकाशन

गोडवा'काव्यसंग्रहातून घडते सामाजिकतेचे दर्शन,अल्पाक्षरी हायकू प्रकारातून समाज मनाचा वेध घेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न - डॉ.दीपकराव कासराळीकर केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र,सेवानिवृत्त प्राध्यापक आणि कवी माणिकराव आनंदगावकर...

error: Content is protected !!