Homeताज्या बातम्यामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आमिष दाखवून महिलेवर तीन वर्षे लैंगिक अत्याचा

मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आमिष दाखवून महिलेवर तीन वर्षे लैंगिक अत्याचा

धाराशिव/ प्रतिनिधी गायकवाड़

धाराशिव एका गावातील ४९ वर्षीय महिलेला तिच्या दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आमिष दाखवून सलग तीन वर्षे महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणावर धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबधी सविस्तर वृत्त असे की, एका ४९ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून एका तरुणाविरुद्ध फसवणूक, लैंगिक अत्याचार व धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचे नाव व गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता अनुसूचित जातीची असल्याचे माहित असतानाही आरोपी तरुणाने तिचा विश्वास संपादन करत सन २०२२ पासून ते ८नोव्हेंबर २०२५ पर्यंत विविध प्रकारे तिची फसवणूक केली. तसेच तिला ‘बायकोसारखे’ वागविण्याचे आश्वासन देत तसेच तिच्या दोन मुलींच्या शिक्षणाची व लग्नाची जबाबदारी घेण्याचे अमिष दाखवत आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

इतकेच नव्हे, तर आरोपीने अत्याचाराचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पीडिता पोलीसांकडे गेल्यास तिला आणि तिच्या मुलींना जीवे मारण्याची धमकी देऊन दडपशाही केल्याचे आरोप आहेत. या संदर्भात पीडितेने २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ६९, ३५१ (२) तसेच अ.जा./ज.जा. प्रतिबंधक कायदा कलम ३ (२) (व्हिए) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

केज येथे प्रा.माणिकराव आनंदगावकर यांच्या ‘गोडवा’ हायकू काव्य संग्रहाचे थाटात प्रकाशन

गोडवा'काव्यसंग्रहातून घडते सामाजिकतेचे दर्शन,अल्पाक्षरी हायकू प्रकारातून समाज मनाचा वेध घेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न - डॉ.दीपकराव कासराळीकर केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र,सेवानिवृत्त प्राध्यापक आणि कवी माणिकराव आनंदगावकर...

error: Content is protected !!