Homeमहाराष्ट्रकेजमध्ये श्री परशुराम जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन ; विविध कार्यक्रमांची मांदियाळी

केजमध्ये श्री परशुराम जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन ; विविध कार्यक्रमांची मांदियाळी

केज/प्रतिनिधी

केज येथील समस्त ब्राह्मण समाज व चतुर्वेद प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री परशुराम जयंती उत्सवाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.दि. १८ आणि १९ एप्रिल २०२६या दोन दिवसांच्या काळात विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण आहे.शनिवारी रांगोळी स्पर्धा व रक्तदान शिबीराने उत्सवाची सुरुवात होणार आहे. शनिवार,१८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी दोन गटांत रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. (लहान गट: १० ते १७ वयोगट आणि मोठा गट: १८ ते ४५ वयोगट) याच दिवशी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले आहे.हे सर्व कार्यक्रम शुक्रवार पेठ येथील श्री बालाजी मंदिर येथे पार पडणार आहेत.

रविवारी भव्य मोटारसायकल रॅली

रविवार १९ एप्रिल२०२६ रोजी दुपारी ३-३० वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे.ही रॅली वकीलवाडी हनुमान मंदिर येथून सुरू होऊन कानडी रोड कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक,भवानी चौक,मंगळवार पेठ कॉर्नर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,गुंड गल्ली,लोढे गल्ली मार्गे श्री बालाजी मंदिर येथे विसर्जित होईल.

व्याख्यान आणि सत्कार समारंभ

रविवार सायंकाळी ५ वाजता श्री भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर श्री.ह.भ.प. लक्ष्मण महाराज इनामदार (गुरुजी) यांचे ‘श्री भगवान परशुराम’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान होणार आहे. व्याख्यानानंतर विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवलेले विद्यार्थी आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने होणार आहे.हा जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्या साठी समस्त ब्राह्मण समाज व चतुर्वेद प्रतिष्ठान,केजचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.या सर्व कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!