Homeमहाराष्ट्रमान्सून पूर्व स्वच्छता मोहिमेस केज नगरपंचायतच्या वतीने सुरुवात

मान्सून पूर्व स्वच्छता मोहिमेस केज नगरपंचायतच्या वतीने सुरुवात

मान्सून पूर्व स्वच्छता मोहिमेस केज नगरपंचायतच्या वतीने सुरुवात

शहरातील सुजान नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आपले शहर स्वच्छ व सुंदर शहर करण्यास सहकार्य करावे-डॉ.इनामदार डॉ. बनसोड

केज/प्रतिनिधी

केज शहरांमध्ये मान्सून पूर्व स्वच्छता मोहिमेस नगरपंचायतच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे तरी केज शहरातील सुजान नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आपले शहर स्वच्छ व सुंदर शहर करण्यास सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते डॉ.हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ. सौ.सीताताई बनसोड यांनी केले आहे.
केज नगरपंचायत च्या वतीने मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेस बुधवार रोजी प्रभाग क्रमांक सात मधील नालंदा विद्यालया पासून श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ. हरुणभाई इनामदार म्हणाले की,बुधवार व गुरुवर रोजी प्रभाग क्रमांक सात,आठ,नऊ या प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे सदर स्वच्छता मोहीम ही प्रभाग क्रमांक आठ मधून कळंब रोड वरील माऊली सिनेमागृह पर्यंत करून शहरातील सर्व मुख्य रस्ते व सर्व प्रभागातील मुख्य रस्त्यावरील मोठमोठ्या नाल्या व गल्लीतील छोट्या नाल्या आणि सार्वजनिक ठिकाणचे आणि रिकाम्या परिसरातील सर्व झाडे तोडून संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर शहर करणार आहोत पावसाळ्यामध्ये पाणी तुंबून नागरिकांची गैर सोय होऊ नये व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये नागरिक पावसाळ्यात निरोगी राहावेत या संकल्पनेतून मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम राबवत आहोत. नगराध्यक्षा सौ. डॉ. सीताताई बनसोड यांनी म्हटले की, सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत यावर्षी उन्हाची अति तीव्रता असल्याने नागरिकांनी उन्हामध्ये घराबाहेर पडू नये महत्वाच्या कामासाठीच नागरिकांनी सकाळी व संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडावे व स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. पुढे बोलताना बनसोड म्हणाले की, सध्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन आम्ही नगरपंचायत मार्फत शहरांमध्ये नवीन ६५ बोरवेल घेतल्या आहेत नागरिकांना पाणी कमी पडणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत त्याचबरोबर पावसाळाही जवळ आला असल्याने नागरिकांची गैर सोय होऊ नये म्हणून केज नगरपंचायत मार्फत मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवत आहोत या मोहिमेत केज शहरातील सुजाण नागरिकांनी सहभागी होऊन आपला परिसर व शहर स्वच्छ करण्यासाठी सहकार्य करावे आपले शहर सुंदर शहर राहण्यासाठी नागरिकांनी शहरातील मुख्य रस्त्यावर व परिसरातील रिकाम्या जागेवर घरातील कचरा न टाकता घंटागाडी मध्ये टाकावा जर एखाद्या प्रभागांमध्ये घंटागाडी न आल्यास आमच्याशी संपर्क साधावा तात्काळ त्या ठिकाणी घंटागाडीची सोय केली जाईल. आपण जर आपले घर, आपला परिसर आणि आपले शहर स्वच्छ ठेवले तर आपले आरोग्य निरोगी राहील. त्यासाठी सर्व सुजाण नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आपला परिसर आणि आपले शहर स्वच्छ करण्या स सहकार्य करावे असे आवाहन गटनेते डॉ.हरूणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!