Homeमहाराष्ट्रआंगनवाडी सेविका, आशा व मध्यान भोजन बनवणारांच्या हक्कांसाठी भारतीय जनता मजदुर...

आंगनवाडी सेविका, आशा व मध्यान भोजन बनवणारांच्या हक्कांसाठी भारतीय जनता मजदुर संघाच्या वतीने निवेदन

केज/प्रतिनिधी

देशातील आंगनवाडी सेविकांना श्रमिक म्हणून वैधानिक मान्यता,किमान वेतन,सामाजिक सुरक्षा व पेन्शन यांसारखे मूलभूत हक्क मिळावेत,यामागणी साठी दि.३१ डिसेंबर २०२५ पासून भारतीय जनता मजदूर संघ यांच्या वतीने राष्ट्रव्यापी पत्र व ज्ञापन आंदोलन आयोजित आले.यावेळी केज तहसीलदार राकेश गिड्डे यांना निवेदन दिले. हा उपक्रम औपचारिक किंवा प्रतीकात्मक नसून, संविधानिक अधिकार आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या अंमलबजावणी साठीचा गंभीर लोकशाही प्रयत्न असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.देशभरातील सुमारे २७ लाख आंगनवाडी सेविका गेल्या अनेक दशकांपासून माता बालक पोषण,सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक कल्याणाची जबाबदारी सातत्याने पार पाडत आहेत.मात्रआजही त्यांना श्रमिक दर्जा,किमान वेतन तसेच सामाजिक सुरक्षे पासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.सर्वोच्च न्यायालयाने दीर्घकाळ नियमित व नियंत्रित स्वरूपाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ मानधनधारक स्वयंसेवक न मानता श्रमिक म्हणून मान्यता देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली असताना ही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघटनेने या प्रश्नांच्या निराकरणाची अपेक्षा सध्याच्या सरकारकडूनच असून,संघर्षाची भूमिका न घेता संविधानिक व संवाद आधारित मार्गाने हे ज्ञापनपत्र आंदोलन राबविण्यात येत आहे.या आंदोलनाअंतर्गत महिला व बाल विकास मंत्रालय, श्रम व रोजगार मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच माननीय पंतप्रधान यांना निवेदन सादर करण्यात आले. दबाव निर्माण करणे हा उद्देश नसून,धोरण,कायदा आणि प्रत्यक्ष परिस्थिती तील तफावत अधोरेखित करून सर्वोच्च न्यायालया च्या निर्देशांनुसार श्रम- सन्मान सुनिश्चित करण्या साठी सकारात्मक पावले उचलली जावीत,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.दरम्यान, देशातील बौद्धिक वर्ग, शिक्षणतज्ज्ञ,धोरण विशेष तज्ञ आणि विचारवंत नागरिकांनी याविषयाकडे भावनिक नव्हे तर कायदेशीर,संविधानिक व नीतिगत दृष्टिकोनातून पाहून न्याय्य तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. केज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांनी निवेदन देण्यासाठी उपस्थित होत्या भारतीय जनता मजदुर संघाचे महाराष्ट्र सचिव धनंजय कुलकर्णी,मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील, रामदास तपसे,शेषेराव कसबे यांच्यासह संगीता देशपांडे,मीरा नेहरकर , अंजली खोत,रोहिणी रुईकर,कमल सत्वधर, कमल लांडगे,शाहीन शेख,सुनीता भालेकर, समीक्षा घोडके आदी महिला भगिनी उपस्थित होत्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!