विवाहितेचा सतत पैशासाठी छळ केल्याप्रकरणी नवऱ्यासह ६ जणांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल
केज/प्रतिनिधी
एका विवाहितेला तिच्या माहेराहून वडिलाकडून १५ लाख रुपयांची मागणी करून सतत सासरच्यांनी छळ केल्या प्रकरणी नवऱ्यासह सासू-सासरे दोन नंदा व दीर या सहा जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, आयशा शारेफ कुरेशी वय २३ वर्षे रा. बाराभाई गल्ली अंबेजोगाई, ह.मु. कुरेशी मोहल्ला दर्गा रोड केज येथील रहिवाशी असून आयशा कुरेशी यांचे दिनांक १८/१०/२०२१ रोजी शारेफ फिरोज कुरेशी यांच्या बरोबर मुस्लिम धर्मातील रीतीरीवाजा प्रमाणे लग्न झाले होते. सियानाप्रमाणे लग्न हे काजी यांच्या समक्ष झाले होते. लग्नात तीन लाख रुपये हुंडा व सोन्याचे दागिने, संसार उपयोगी वस्तू, मानपान देऊन मोठ्या थाटामाटात आयशा यांच्या आई-वडिलांनी केज येथे एका मंगल कार्यालयामध्ये लग्न लावून दिले होते.
लग्नानंतर आयशा यांना सासरच्या लोकांनी दोन महिने चांगले नांदवले. त्यानंतर त्यांना सासरचे लोक पती शारेफ फेरोज कुरेशी यांनी त्याला काम धंदा नाही. त्यास हार्डवेअरचे दुकान टाकायचे आहे. त्यासाठी तू तुझे आई-वडील यांच्याकडून १५ लाख रुपये घेऊन ये असे म्हणाले असता, आयशा यांनी त्यांच्या वडिलांना फोन करून सांगितले की, तुम्ही माझ्या पतीला हार्डवेअरचे दुकान टाकायचे आहे. त्यासाठी तुम्ही त्यांना १५ लाख रुपये द्या असे आयशा या वडिलांना म्हणल्या असता त्यांचे वडील म्हणाले आत्ताच तुझे लग्न झाले आहे. मी पंधरा लाख रुपये कुठून देऊ असे वडील म्हणाले असता त्यांनी त्यांचे पती शारेफ यांना सांगितले की, माझ्या वडिलांकडे पैसे नाहीत.त्यावर शारेफ यांनी तुझ्या वडिलांनी मला पैसे दिले नाही. तर मी दुसरं लग्न करीन तू तुझ्या वडिलांना तुमचे प्लॉट विकून मला पंधरा लाख रुपये द्यायला सांग असे म्हणाला, त्यानंतर काही दिवसांनी आयशा यांचे वडील हे आंबेजोगाई येथे त्यांना भेटण्यासाठी गेले होते.आयशा यांनी त्यांच्या वडिलांना सांगितले की, तुम्ही जर माझ्या पतीला पैसे दिले नाही तर माझे पती हे दुसरे लग्न करतो. असे म्हणत आहेत.
त्यावेळी त्यांच्या वडिलांनी पाच लाख रुपये हे आयशा यांचा पती शारेफ यास दिले. त्यावर शारेफ हा पत्नीला म्हणाला की, पाच लाखात मी दुकान कस टाकू आणखी दहा लाख रुपये मागून घे त्यानंतर काही दिवसांनी तारीख आठवत नाही.आयशा यांच्या सासू आरेफा फेरोज कुरेशी यांनी आयशा यांच्या नंदा सुभैया जावेद कुरेशी रा. रेणापूर, रुबीया याकूब कुरेशी रा.नांदेड या दोघींना फोन करून बोलावून घेतले. त्या दोघी आंबेजोगाई येथे घरी आल्यानंतर आयशा यांची सासू व दोन्हीही नंदा यांनी त्यांना म्हणाले की, तुला जेवण बनवता येत नाही असे कारण काढून त्यांनी शिवीगाळ करून आयशा यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.
दीर फैसल फेरज कुरेशी यांनी आयशा यांना जेवण चांगले बनवले नाही. असे म्हणून जेवण फेकून देऊन शिवीगाळ करून तुझ्या आई-वडिलांनी तुला जेवण बनवायचे शिकवलं नाही का असे म्हणून त्यांच्या हातावर पाय देत होता.
तसेच फेरोज सत्तार कुरेशी सासरा म्हणाला की, तुझ्यासोबत माझ्या मुलाचे लग्न पैशासाठी केले आहे. असे सतत म्हणत होता. व माझ्या पतीला तू हिला सोडून दे असे म्हणत होता. काही दिवसानंतर आयशा यांचे वडील हे मंगळवार बाजार असल्याने त्यांना भेटण्यासाठी आंबेजोगाई येथे गेले असता त्यांनी वडिलांना झालेला प्रकार सांगितला त्यांच्या वडिलांनी केज येथील त्यांचे नातेवाईक, व आयशा यांच्या सासरचे नातेवाईक यांना बोलावून सर्वांना एकत्र बसून सांगितले की, माझ्या मुलीला दिवस गेलेले आहेत. तिला पैशासाठी काही त्रास देऊ नका आम्ही तुम्हाला पाच लाख रुपये दिले आहेत. आता पैसे मागू नका असे सांगितले. त्यावर आयशा यांना काही महिने चांगले नांदवले.
आयशा या डिलेव्हरीसाठी माहेरी गेल्या व त्या डिलेव्हरी झाल्यानंतर सव्वा महिन्यानंतर त्यांना त्यांचे सासरचे सर्व लोक आले होते. त्यावेळेस पण त्यांनी आम्ही परत दुकानात सामान आणायचे आहे दहा लाख रुपये द्या असे म्हणले असता त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी तीन लाख रुपये दिले. व त्यांना सासरी घेऊन गेले त्यानंतर परत पैशासाठी सतत त्रास देत होते. परंतु त्या त्यांच्या मुलाकडे पाहून त्रास सहन करत होत्या. ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तारीख आठवत नाही. आयशा यांना उपाशी पोटी ठेवून त्यांचा सतत शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना घरातून हाकलून दिले.
आयशा या गेल्या दोन महिन्यापासून त्यांच्या आई-वडिलांकडे माहेरी मुलासोबत राहत आहेत.
दुपारच्या वेळी आयशा ह्या एकटीच घरी असताना त्यांचा नवरा,सासू-सासरा हे यांचे माहेर केज येथे येऊन तुझे वडील पैसे देणार आहेत की,नाही त्यावर आयशा ह्या म्हणाल्या की, पैसे नाहीत देणार असे म्हणल्या असता त्यांनी आयशा यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करून तेथून निघून गेले. म्हणून आयशा कुरेशी यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाणे येथे पती शारेफ फिरोज कुरेशी, सासू आरेफा फेरोज कुरेशी, रा. आंबेजोगाई, ननंद सुमैया जावेद कुरेशी रा.रेणापूर, रुबिया याकूब कुरेशी रा.नांदेड, फैसल फेरोज कुरेशी, फिरोज सत्तार कुरेशी रा.आंबेजोगाई यांच्या विरुद्ध गु.र.नं.७११/२०२५ कलम ८५,११५(२),३५२,३५१(२),३(५) प्रमाणे अधिनियम भारतीय न्याय संहिता (बी एन एस),२०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कानिस्टेबल श्रीमती निर्मला जाधव या करत आहेत.





















