केज/प्रतिनिधी
भीमा कोरेगावच्या शौर्यदिनाच्या निमित्ताने व्हाट्सअप स्टेटसला व इंस्टाग्राम या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वायरल करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्याकडे दलित चळवळीतील सर्व सामाजिक संघटना व पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, रोहन गलांडे नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या व्हाट्सअपला स्टेटस ठेवून व इंस्टाग्राम या सोशल मीडियावर भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाच्या निमित्ताने शूरवीरांच्या बाबत त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट वायरल केली आहे.
त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. तसेच सदर इसम हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वृत्तीचा व सराईत आहे.
तरी संबंधितावर माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि जातीय तेढ निर्माण करून मागासवर्गीय शूरवीरांचा अवमान केला तसेच त्याला भीमा कोरेगाव येथील शूरवीर हे मागासवर्गीय समाजाचे असल्याचे जाण असल्याची आणि सदर आक्षेपार्ह पोस्ट करणारा हा सुशिक्षित असल्याने त्याला सर्व बाबीची माहिती असताना देखील त्यांनी खोडसाळपणे व जातीय भावनेने प्रेरित होऊन सदर पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी त्याच्यावर अनुसूचित जाती-जमाती कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दलित चळवळीतील सर्व संघटना व पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी केली आहे.
या निवेदनावर योगेश गायकवाड, बाळासाहेब ओव्हाळ, चंद्रकांत खरात सर, बबलू साखरे, लखन हजारे, अशोक गायकवाड, तात्या गवळी, गौतम बचुटे, पांडुरंग जोगदंड, बाबुराव गालफाडे, लिंबराज गायकवाड, समाधान बचुटे, अमोल मस्के, प्रवीण मस्के इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सदर मागणीचे निवेदन हे केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी स्वीकारले.
सदर प्रकरणाचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे करत आहेत. सदर प्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे व ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
चौकट:-
आमच्या शूरवीरांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट वायरल करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल करून संबंधित दोषीला तात्काळ अटक करण्यात यावी. आमचे पूर्वज शूरवीर यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करून सोशल मीडियावर वायरल करुन आमच्या आदर्शांचा आपमाण केल्यामुळे आमच्या दलित समाज बांधवांच्या भावना दुखवल्या आहेत त्याकरिता संबंधित दोषीवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करून अटक करण्यात यावी जर पोलीस प्रशासनाने संबंधित दोषीवर गुन्हा दाखल करून अटक केली नाही तर तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशासनाला माध्यमांशी बोलताना दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिला आहे.





















