केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या श्री संस्कार इंग्लिश स्कूल मध्ये आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार इंग्लिश स्कूल मध्ये आज स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पूजन करुन अभिवादन करण्यात आले. व श्री संस्कार इंग्लिश स्कूल मधील चिमुकल्यांनी सावीत्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर उत्स्फूर्त भाषणे केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संस्कार इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष अनिल गलांडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर देशमुख, सतिष भिसे, रविकुमार गायकवाड मा. ग्रामपंचायत सदस्य, सिमा फुटाणे प्रिन्सीपल श्री संस्कार इंग्लिश स्कूल, अश्विनी राऊत हे होते.
यावेळी सर्व शिक्षीका, प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्रिन्सीपल सौ सिमा फुटाणे, शिक्षीका सोनाली खंदारे मॅडम, सौ कोमल कापरे मॅडम, सौ .आरती आचार्य मॅडम, सौ. रेश्मा गायकवाड मॅडम, सौ. प्रियंका शिंदे मॅडम, सौ. वैष्णवी काळे मॅडम, प्रिती गाते मॅडम, सेविका सपाटे, संस्थेचे पदाधिकारी अमोल गलांडे, चालक अमजत पठाण, शाम घोडके, अशोक लोखंडे, आदित्य गलांडे, ज्ञानेश्वर पोपळघट, संचित गलांडे, संस्कार गलांडे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिन्सीपल सिमा फुटाणे मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन सौ आरती आचार्य मॅडम यांनी केले तर आभार वैष्णवी काळे मॅडम यांनी केले.

















