Homeमहाराष्ट्रकला क्रीडा विश्व समितीच्या वतीने श्री स्वामी समर्थ वृद्ध आश्रम येथे अन्नदान...

कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने श्री स्वामी समर्थ वृद्ध आश्रम येथे अन्नदान करून मूकनायक दिन साजरा

केज | प्रतिनिधी :

यश तांबवेश्वर सेवाभावी संस्था, केज संचलित स्वामी समर्थ वृद्धाश्रम (बोबडेवाडी, ता. केज) येथे मूकनायक दिनानिमित्त अत्यंत भावनिक, सामाजिक बांधिलकी जपणारा व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वृद्धांच्या जीवनात आनंद, आपुलकी व सन्मानाची भावना निर्माण करणारा हा उपक्रम तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.

या कार्यक्रमास वृद्धाश्रमाचे संस्थापक श्री.महादेव सोपानराव कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, कलाकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मूकनायक दिनानिमित्त केज येथील कला क्रीडा विश्व समितीच्या कलाकारांनी गीत-संगीताचा सुंदर कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वृद्धांना गाण्यांची महफिल बहाल करण्यात आली. वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान व आनंद पाहून उपस्थितांचे मन भरून आले.

या उपक्रमात कला क्रीडा विश्व समितीच्या सर्व कलावंतांच्या पुढाकारातून वृद्धाश्रमासाठी अन्नदान करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला सामाजिक सेवेची खरी उंची लाभली.
यावेळी अनिल वैरागे, मुनीर कुरेशी, बलभीम मस्के, ज्ञानेश्वर नागरगोजे, महेश जाधव, श्रीनिवास नवगिरे, अमोल सरवदे, धनराज भालेराव, सागर वाघमारे, ॲड. अनिता मुंडे, सुनिता बोधने, दिक्षा कांबळे, विमल अंकुशे, सुनिता नागरगोजे, छबु अंधारे, सिंदू मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मूकनायक दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच नुकतेच निधन झालेल्या अजित पवार यांना उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमात सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, पांडुरंग कसबे, पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीत घाडगे, तालुकाध्यक्ष दिनकर जाधव, जयपाल रोकडे ,चंद्रपाल मस्के यांच्यासह विविध माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते. याच वेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक महादेव (बापु) सोपानराव कराड यांचा सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

आलेल्या सर्व मान्यवरांसाठी तसेच वृद्धांसाठी कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
या स्तुत्य उपक्रमामुळे स्वामी समर्थ वृद्धाश्रमाच्या कार्याला तालुक्यातून मोठी दाद मिळाली असून, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी असे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!