Homeमहत्त्वाचेकेकतसारणी येथे श्री संत साई बाबा मंदिरात भव्य कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा...

केकतसारणी येथे श्री संत साई बाबा मंदिरात भव्य कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव, तीन दिवसीय मह़ोत्सवाला आजपासून सुरुवात

केज/प्रतिनिधी

केकतसारणी ता.केज, जि.बीड येथे श्री संत साई बाबा मंदिरात आयोजित भव्य कलशारोहण सोहळा,मूर्ती प्राणप्रतिष्ठा व यज्ञ महोत्सवाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली असून गावात सर्वत्र धार्मिक उत्साहाची लाट उसळली आहे.भक्तिमय वातावरण,मंदिराची सजावट,दीपमाळा आणि धार्मिक पताकांच्या सजावटीने परिसर आधीच उत्सवी बनला आहे.दि.२४ नोव्हेंबर स़ोमवारी मिरवणुकीने सोहळ्याची सुरुवात होणार असुन सोमवार, दि.२४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मूर्तीची भव्य मिरवणूक निघणार आहे.ढोल-ताशे, लेझीम पथक,भजनी मंडळ व साईनामाच्या गजरात निघणाऱ्या या मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी होणार आहेत.गावातून निघणाऱ्या मिरवणुकीत ग्रामस्थ व महिला तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सोमवारी संध्याकाळी ९ ते ११ भावरत्न गुरुदास विविध कथा व किर्तनकार ह.भ.प.श्री समाधान महाराज शर्मा,ठाकुर रामकृष्ण परमहंस परिवार केजकर यांचे हरी किर्तन होणार आहे. त्यांनी साईबाबांच्या चरित्रावर खुप कथा केलेल्या आहेत.दि.२५ नोव्हेंबर रोजी मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता ह.भ.प.श्री.कबीर महाराज आतार(राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते सातारा) यांचे भव्य कीर्तन होणार आहे.त्यांच्या कीर्तन-प्रवचनाने भक्तांना अध्यात्मिक चिंतनाचा अनोखा अनुभव मिळणार आहे.दि.२६ नोव्हेंबरला प्रमुख कार्यक्रम मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा दुपारी १२ वाजुन ११ मिनीटांनी होणार आहे.बुधवार दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.श्री.महंत भगवान महाराज शास्त्री (साधू शिवराम पुरी मठ संस्थान वरपगाव) यांचे कीर्तन होणार आहे.प्राण प्रतिष्ठा विधीनंतर सर्व भाविकांसाठी महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिर परिसरात आकर्षक सजावट

साईबाबांचा सुशोभित मंडप,पारंपरिक फुलांची आरास,तोरणांनी नटलेले प्रवेशद्वार आणि दिव्यांची सजावट यामुळे मंदिर परिसर सणा सारखा उजळून निघाला आहे. आयोजकांनी भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची,बसण्याची व पार्किंगची उत्तम व्यवस्था केली आहे.

आयोजकांची माहिती

या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुजान रबर प्राॕडक्ट,मुंबई आणि साई परिवार,केकसारणी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
आयोजकांनी सर्व श्रद्धावान भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा ऐतिहासिक सोहळा सफल करण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

केज येथे प्रा.माणिकराव आनंदगावकर यांच्या ‘गोडवा’ हायकू काव्य संग्रहाचे थाटात प्रकाशन

गोडवा'काव्यसंग्रहातून घडते सामाजिकतेचे दर्शन,अल्पाक्षरी हायकू प्रकारातून समाज मनाचा वेध घेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न - डॉ.दीपकराव कासराळीकर केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र,सेवानिवृत्त प्राध्यापक आणि कवी माणिकराव आनंदगावकर...

error: Content is protected !!