Homeताज्या बातम्याकेज तहसीलदार यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यात तक्रार : केज महसूल विभागात...

केज तहसीलदार यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यात तक्रार : केज महसूल विभागात खळबळ !

केज /प्रतिनिधी
प्रशासनाला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तहसीलदारांच्या बनावट सह्या करून अर्धन्यायिक प्रकरणाचा आदेश पारित केल्याप्रकरणी तत्कालीन नायब तहसीलदार विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केजचे तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केज पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवली असून संपूर्ण महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अंतर्गत अर्धन्यायिक अधिकार हे तहसीलदारांना दिलेले असतात, मात्र संबंधित प्रकरणात तत्कालीन नायब तहसीलदारांनी स्वतःहून तहसीलदारांचे अधिकार वापरून आदेश पारित केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

याशिवाय आदेशावर तहसीलदारांच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून तो आदेश ग्राम महसूल अधिकारी तसेच तलाठी कार्यालयाला पाठवण्यात आल्याचेही चौकशीत उघड झाले ही बाब उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीचे तपासाचे आदेश दिले आणि सखोल चौकशीत आदेशातील सही बनावट असल्याचे पुष्टी झाली आहे. तसेच हे आदेश देण्यासंदर्भातील प्रक्रिया बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केज तहसीलदारांनी अधिकृतपणे पोलिसात तक्रार नोंदवली या बनावट आदेशामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल झाली असल्याची माहिती ही समोर आली.

महसूल विभागातील अधिकारी तलाठी यांच्याही कामकाजावर त्याचा परिणाम झाला प्रशासनाची दिशाभूल करून स्वतःच्या पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप गुन्ह्यात करण्यात आला आहे. कायद्याने अर्धन्यायिक प्रक्रिया ही अत्यंत संवेदनशील व जबाबदारीची असते. त्यात कोणतेही आदेश तहसिलदारांच्या थेट सहीशिवाय वैद्य ठरत नाहीत. पण संबंधित नायब तहसीलदाराने तहसीलदार असल्याचा भास निर्माण करून आदेश देणे सहीची बनावट प्रत तयार करणे आणि ती शासन अधिकाऱ्यांना पाठवून हे सर्व गंभीर बेकायदेशीर कृत्य ठरल्याने आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फसवणूक, सरकारी कागदपत्रांची बनावट तयार करणे आणि अधिकाराचा गैरवापर यासह अनेक गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे केज तालुक्यातच नव्हे तर संभाजीनगर महसूल व जिल्हाधिकारी कार्यालयाचे खळबळ उडाले आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांची विश्वसनीयता डागाळणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत वरिष्ठांकडून निर्देश देण्यात आले आहेत.

यामुळे महसूल विभागातील अंतर्गत प्रक्रियांचे पुनरावलोकन तसेच कामकाजात पारदर्शकता आणि दस्तऐवज पडताळणी अधिक कडक करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. स्थानिक पातळीवर या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू असून संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई अपेक्षित असल्याचे जनतेतून सूर निघत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शंभर मीटर धावण्यात सीमा बळीराम उनवणी यांनी पटकावला दुसरा क्रमांक

अंबाजोगाई /प्रतिनिधी कै.दे.बा.ग योगेश्वरी नूतन विद्यालय प्राथमिक विभाग अंबाजोगाई येथील विद्यार्थी प्रिय सहशिक्षिका व उत्तम खेळाडू.. श्रीमती.सीमा बळीराम उनवणे .या विभागीय स्तरावरील 100 मीटर धावणे...

भारतीय जनता मजदुर संघाचे मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील यांचा विष्णु भाऊ घुले यांच्या...

केज/प्रतिनिधी भारतीय जनता मजदुर संघाच्या मराठवाडा सचिव पदावर निवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा विष्णु भाऊ घुले यांच्या सह मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात...

छत्रपती संभाजीनगर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याचा हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावला

परळी/ प्रतिनिधी काल झालेल्या वसुसाय गाव, ता.गंगापूर जिल्हा छ. संभाजीनगर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याच्या हॉलिबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवला . या यशा...

उमरी रोड भागातील नागरिकांचा लाईटचा प्रश्न अखेर मार्गी

डॉ.हारुणभाई इनामदार व डॉ. सौ. सीताताई बनसोड यांच्या प्रयत्नाला यश केज/प्रतिनिधी केज शहरातील उमरी रोड परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना सुरळीतपणे लाईट नसायची...

नगर मनमाड महामार्गाची दुरुस्तीची व्यथा

अहिल्या नगर प्रतिनिधी - गणेश रणशिंग अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून राहुरी हद्दीतील या मार्गावर आतापर्यंत खूप लोकांचे बळी गेले...

error: Content is protected !!