Homeमहाराष्ट्रमहावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध सरपंच व ग्रामस्थांचा संताप, तात्काळ बदलीची मागणी

महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध सरपंच व ग्रामस्थांचा संताप, तात्काळ बदलीची मागणी

केज/प्रतिनिधी

अंबाजोगाई विभागातील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता सौ.शीतल वाजेद सय्यद यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या तांबवा, साबला धर्माळा,तरनळी, नागझरी,कोल्हेवाडी, कासारी व मैंदवाडी या गावांतील सरपंच,उप सरपंच तसेच ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंत्याकडे लेखी निवेदनाद्वारे तात्काळ बदलीची मागणी केली आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे,रब्बी हंगाम सुरू असताना शेती पंपांना दिला जाणारा वीजपुरवठा फक्त ८ तासा वर आणण्याचा आदेश कनिष्ठ अभियंता सय्यद यांनी संबंधित सबस्टेशन ला दिला आहे.यापूर्वी फिडर ओव्हरलोडमुळे गावांचे दोन भाग करून ६ तासांचा टप्पा सुरू होता. मात्र आता सर्व गावांना एकत्र करून फक्त ८ तासच वीजपुरवठा देण्याचा ‘तुघलकी निर्णय’ घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शेतकरी आधीच अतिवृष्टी नापिकी यामुळे त्रस्त असताना जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.तसेच या अधिकाऱ्याची बदली पुढील दोन दिवसांत न झाल्यास सोमवारी कार्यकारी अभियंता कार्यालयात सामूहिक आत्मदहन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, तहसीलदार,खासदार बजरंग बप्पा सोनवणे, आमदार नमिताताई मुंदडा,महावितरणचे अधीक्षक अभियंता बीड तसेच उप कार्यकारी अभियंता केज यांना सादर करण्यात आली आहे.याघटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून महावितरण कडून याबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लाकेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

error: Content is protected !!