Homeमहत्त्वाचेकेज न.प.चे गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांच्या पाठपुराव्याला यश.

केज न.प.चे गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांच्या पाठपुराव्याला यश.

“चाळीस वर्षा पासून चा छोट्या व्यावसाय धारकांच्या व्यावसायाचा प्रश्न मार्गी

” जिरायत खात्याची जागा अखेर केज नगरपंचायतीच्या ताब्यात आल्यामुळे व्यावसाय धारकात नवचैतन्य निर्माण झाले असून आनंदोत्सव व्यक्त केला जात आहे.

केज/प्रतिनिधी

केज शहरातील मागील चार ते साडेचार वर्षा पासून सार्वजनिक विकासकामांना गती मिळत असतांना एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना प्रत्यक्षात अनेक दिवसांच्या प्रयत्ना नंतर गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला केज येथील छोट्या व्यावसाय धारकांच्या व्यावसायाच्या जागेचा प्रश्न मिटला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये गटनेते हारुणभाई इनामदार यांनी दिली आहे. जिरायत खात्याची शासकीय जागा अधिकृतपणे केज नगरपंचायत प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली आहे. जागेचे ताबा पत्र महसूल प्रशासनाने अधिकृतपणे केज नगरपंचायत ला हस्तांतरित केले आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मंगळवार, दिनांक ४ जून २०२६ रोजी ही हस्तांतरण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली.असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारुणभाई इनामदार व केज नगर पंचायत च्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांच्या
पाठपुराव्यामुळे आणि सर्व राजकीय वरीष्ठांच्या सहकार्याने
केज नगरपंचायतीला यश प्राप्त झाले आहे अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड व गटनेते हारूणभाई इनामदार यांनी सदर जागेचा ताबा घेते वेळी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यासाठी गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांनी सर्व वरिष्ठांना आणि नगरसेवकांना विश्वासात घेऊन सातत्याने शासन व प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला, त्यांच्या या पाठपुराला यश येऊन गोरगरीब छोट्या व्यवसायिकांना आधार मिळाला आहे.
केज शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या जागेचा वापर जन हितासाठी व्हावा, यासाठी या दोन्ही नेत्यांनी सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करून
या महत्त्वपूर्ण कामात केजच्या विकासासाठी स्व.लोकनेते विलासरावजी देशमुख,माजी खासदार रजनीताई पाटील, स्व.विमलताई मुंदडा, आणि विद्यमान खासदार बजरंग बप्पा सोनवणे, विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते रमेशरावजी आडसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे यांचे व अप्रत्यक्ष नेतेमंडळी चे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर केज नगरपंचायत चे मुख्यधिकारी, नगरसेवक व सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या विशेष प्रयत्नांमुळे हस्तांतरणाचे आदेश तातडीने निघण्यास मोठी मदत झाली आहे अशा प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना इनामदार व बनसोड यांनी दिल्या आहेत.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आणि शासकीय जागा हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी राज्याचे दिवंगत नेतृत्व ना. अजितदादा पवार यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य व खंबीर मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा अधिकारी साहेब व उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांनी शासकीय पातळीवरील अनेक तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी विशेष लक्ष देऊन मोलाचे सहकार्य केले. या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल केज नगरपंचायतीच्या वतीने ना. स्व. अजितदादा पवार आणि जिल्हाधिकारी साहेब व उपजिल्हाधिकारी वजाळे साहेब यांचे जाहीर आभार तमाम केज वासियांच्या वतीने व केज नगरपंचायत च्या वतीने गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी मानले आहे.
ही जागा केज नगरपंचायतीला हस्तांतरित होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे साहेब यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात या प्रकरणातील सर्व कायदेशीर अडचणी दूर करून प्रशासकीय प्रक्रियेला गती दिली होती, ज्याची आज या प्रसंगी कृतज्ञतेने आठवण काढण्यात आली.
कागदपत्रांची अचूक पडताळणी आणि ताबा पावती तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष हस्तांतरणापर्यंत अहोरात्र कष्ट घेऊन अतिशय मोलाचे सहकार्य केले. या दोन्ही महसूल अधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला असून
शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून रस्त्याच्या कडेवर बसुन हातावर पोट भरणाऱ्या व्यावसायीकांचा जिव्हाळ्या चा मोठा प्रश्न मिटणार आहे. मागील चाळीस वर्षापासून जी फरफट व्यावसाय धारकांची चालू होती ती आता मिटणार असून केजच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा जनविकास आघाडीच्या काळात पूर्ण होत असल्या चा आनंद होत असून या कामी आजी, माजी, सर्व राजकीय नेत्यांचे तसेच अधिकाऱ्यांचे आभार इनामदार व बनसोड यांच्याकडून मानण्यात आले. या कामी सर्व यंत्रणा अगदी पारदर्शक पणे राबवून छोट्या व्यावसाय धारकांच्या रोजीरोटीचा प्रश्न तात्पुरता मिटणार आहे यामुळे केज शहरवासियांतून तसेच व्यावसाय धारक आणि
नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

जनविकास आघाडी चे सर्वेसर्वा मा.हारुणभाई इनामदार, नगराध्यक्ष सौ.सिताताई बनसोड यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि ना. अजितदादा पवार, खासदार बजरंग बप्पा सोनवणे व मा. खा. रजनीताई पाटील यांच्या पाठबळामुळे, तसेच उपजिल्हाधिकारी वजाळे साहेब, दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे साहेब व तलाठी साहिल इनामदार यांच्या प्रशासकीय सहकार्यामुळे केज नगरपंचायतीला हक्काची जागा मिळाली आहे. या जागेवर आता सार्वजनिक प्रकल्प, छोट्या व्यावसायधारकांसाठी तात्पुरते प्रश्न मिटणार आहेत तसेच प्रशासकीय इमारत तसेच नागरिकांसाठी उपयुक्त सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, व्यावसाय धारकांनी तसेच केजवासीयांनी जेष्ठ सामाजिक नेते मा. हारुणभाई इनामदार, नगरपंचायत च्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड
आणि सर्व नेत्यांचे वसेच महसूल प्रशासनाचे जाहीर आभार मानले आहेत. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते हारूणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड, जनविकास परिवर्तन आघाडीचे गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेवक जलालभाई इनामदार, लखन हजारे, व्यापारी प्रतिनिधी महेश जाजू यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!