Homeमहाराष्ट्ररुग्णसेवक अमजद खान यांना "क्रांतीवीर अशफाक उल्ला खान स्मृती मानवतावादी गौरव पुरस्कार"...

रुग्णसेवक अमजद खान यांना “क्रांतीवीर अशफाक उल्ला खान स्मृती मानवतावादी गौरव पुरस्कार” जाहीर!

बीड (प्रतिनिधी)

गेल्या एका दशकापेक्षा जास्त कार्यकाळापासून स्वतःचे संपूर्ण आयुष्य गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित करणारे आणि समाजातील उपेक्षितांचे अश्रू पुसणारे बीडचे रुग्णसेवक अमजद खान यांना यंदाचा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठित “क्रांतीवीर अशफाक उल्ला खान स्मृती मानवतावादी गौरव पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला आहे. ‘साप्ताहिक युवा लोकमित्र’ वृत्तपत्राच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त आणि ६ व्या वर्षात पदार्पण सोहळ्याचे औचित्य साधून ‘युवा लोकमित्र परिवार’च्या वतीने या सर्वोच्च पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली.’साप्ताहिक युवा लोकमित्र’तर्फे समाजाच्या कल्याणासाठी आपले रक्त आटवणाऱ्या खऱ्या हिरोंचा गौरव केला जातो. पुरस्कार निवड समितीने अमजद खान यांच्या अथांग आणि संवेदनशील मानवसेवेची या पुरस्कारासाठी एकमुखाने निवड केली आहे.अमजद खान हे गेल्या १० ते १२ वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात गरजू रुग्णांसाठी देवदूत म्हणून कार्यरत आहेत. कर्करोग (Cancer), किडनीचे गंभीर आजार किंवा इतर दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या अत्यंत गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देणे, त्यांच्या औषधोपचाराची व्यवस्था करणे यासाठी अमजद खान अहोरात्र झटत असतात.त्यांच्या सेवेचे सर्वात मोठे आणि मनाला चटका लावणारे वैशिष्ट्य म्हणजे, बीड शहर व परिसरात ज्या मृतदेहांचा सांभाळ करायला कोणी नातेवाईक नसतात, अशा कित्येक लावारिस मृतदेहांवर अमजद खान स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून अत्यंत सन्मानपूर्वक अंतिम संस्कार (दाहसंस्कार) करतात. जात, पात किंवा धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ ‘माणुसकी’ हाच एक धर्म मानून त्यांनी आजवर शेकडो लावारिसांना सन्मानाने निरोप दिला आहे.
२० जून रोजी भव्य सोहळ्यात वितरण
हा ऐतिहासिक आणि भावनिक गौरव सोहळा येत्या शनिवार, २० जून २०२६ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता ‘ताज पॅलेस’, कादरपुरा, बार्शीनाका, बीड येथे अत्यंत दिमाखात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला माननीय आमदार विजयसिंह राजे पंडित, नगराध्यक्षा प्रेमलता ताई पारवे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याच गरिमामयी उपस्थितीत अमजद खान यांना हा सन्मान प्रदान करण्यात येईल.

चौकट
“अमजद खान हे बीड जिल्ह्याचे भूषण आहेत. आजच्या जगात जिथे माणूस माणसाला विसरत चालला आहे, तिथे अमजद खान रुग्णांची सेवा करत आहेत आणि लावारिसांचे अंत्यसंस्कार करत आहेत. थोर क्रांतीकारक अशफाक उल्ला खान यांच्या नावाचा पुरस्कार त्यांना देताना युवा लोकमित्र परिवाराचे हात धन्य झाले आहेत.”
— शेख ताहेर जाफर (संपादक, साप्ताहिक युवा लोकमित्र, बीड)

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रुग्णसेवक अमजद खान यांच्यावर संपूर्ण बीड जिल्ह्यातील सामाजिक संघटना, डॉक्टर वर्ग, सामान्य नागरिक आणि मित्रपरिवाराकडून अतिशय भावुक होऊन अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!