Homeमहाराष्ट्रकेज शहरातील नालंदा विद्यालयात महामानव विनम्र अभिवादन

केज शहरातील नालंदा विद्यालयात महामानव विनम्र अभिवादन

केज/प्रतिनिधी

केज शहरातील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण प्रसारक मंडळ केज संचलित,केज शहरातील नालंदा विद्यालय येथे महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री.नंदकुमार मस्के सर तर प्रमुख प्रमुख वक्ते म्हणून श्री. नवनथ कांबळे सर उपस्थित होते. सर्वप्रथम परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीप, धूपाने,व पुष्पाने पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिन वाघमारे सर यांनी केले प्रस्ताविकानंतर शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी आर्यन बचके यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अभिवादन पर आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक कांबळे.एन.व्ही. सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग विद्यार्थ्यासमोर मांडले. व भारतीय संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
अध्यक्षीय समारोपात शाळेचे मुख्याध्यापक श्री नंदकुमार मस्के सर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उघडून सांगितला बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिकले . कारण तत्कालीन समाजामध्ये जातीयता शिगेला पोहोचली होती.अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी शिक्षणाची कास धरून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
तत्कालीन समाजामध्ये आपले विचार बहुजनापर्यंत पोहोचावेत व समाजामध्ये जनजागृती व्हावी याकरिता बाबासाहेबांनी मूकनायक,
जनता, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत,यासरखी वर्तमानपत्र सुरू केली. कारण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ वर्तमानपत्रे होय. तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी नदी जोड प्रकल्पाची कल्पना मांडली होती. बाबासाहेबांनी भारतामधील पडणाऱ्या पावसाचा महापुरांचा विचार करून आपले जलधोरण तयार केले. त्यांनी तयार केलेल्या जलधरणामुळेच या भारतामध्ये मोठ-मोठी धरण अस्तित्वात आहेत. बाबासाहेबांनी आपल्या देशामध्ये वीज निर्मिती करण्यासाठी पाठपुरावा करून वीज निर्मिती आपल्या देशामध्येच होईल यासाठी प्रयत्न केले. तसेच महाराष्ट्रातील गोरगरीब व बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकरिता “पीपल्स एज्युकेशन सोसायटी बॉम्बे” या शिक्षण संस्थेची स्थापना करून मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून बहुजनांना शिक्षणाची दालने खुली केली. बाबासाहेबांनी महिलांच्या विविध समस्यांचा सखोल साडेचार वर्ष अभ्यास करुण भारतामधील महिलांसाठी “हिंदू कोड बिल” तयार केले व ते संसदेत मांडले परंतु संसदेमध्ये त्या हिंदू कोड बिलाला कडाडून सर्वांनी विरोध केला. बाबासाहेबांनी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. रक्ताचा एक थेंब न सांडता फार मोठी धार्मिक क्रांती घडवून आणली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज ,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अशा महापुरुषांचा आदर्श घेऊन देशासाठी व समाजासाठी चांगले काम करावे. आदर्श नागरिक होण्यासाठी महापुरुषांचे विचार अत्यंत मोलाचे काम करतात.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. वाघमारे.एस.बी.,श्री.
कदम.एस.एस.,श्री.बडे.ऐ.टी.,श्रीमती गुरमे.टी.एम.,या
कार्यक्रमाप्रसंगी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी वाघमारे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!