Homeमहाराष्ट्रक्रांतीकारी योद्धा कर्मवीर दलित बहुजनांचा स्वाभिमान एकनाथ रावजी आव्हाड यांना २५ मे...

क्रांतीकारी योद्धा कर्मवीर दलित बहुजनांचा स्वाभिमान एकनाथ रावजी आव्हाड यांना २५ मे रोजी अभिवादन हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे: उमेश आव्हाड

केज /प्रतिनिधी

कर्मवीर एकनाथरावजी आवाड साहेब
​शोषितांच्या अंधकारमय जीवनात संघर्षाची मशाल पेटवणारे महानायक
​शोषितांच्या हक्कासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे, वंचितांच्या वेदनेला वाचा फोडणारे आणि माणूस म्हणून जगण्याची नवी दिशा देणारे कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमास हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मानवी हक्क अभियान केज तालुका अध्यक्ष उमेश आव्हाड यांनी केले आहे.दुकडेगाव ते दर्बाण
​साहेबांचा प्रवास हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नव्हता, तर तो एका युगाचा संघर्ष होता. दुकडेगाव सारख्या छोट्याशा गावातून सुरू झालेला हा लढा सातासमुद्रापार दरबान (दक्षिण आफ्रिका) मधील जागतिक वर्णभेद परिषदेपर्यंत जाऊन पोहोचला. अन्यायाविरुद्धचा आवाज जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर घुमला, तेव्हा जगाला महाराष्ट्रातील या महानायकाच्या कार्याची दखल घ्यावी लागली.
​गायरानाचा लढा आणि भूमीहक्क
​दलितांना आणि भूमिहीनांना सन्मानाने जगता यावे, यासाठी साहेबांनी हजारो एकर गायरान जमीन मिळवून दिली. जमीन कसणाऱ्याची आणि भूमी कष्टाळूची हा विचार त्यांनी केवळ मांडला नाही, तर तो सत्यात उतरवून हजारो कुटुंबांना हक्काचा आधार मिळवून दिला.
​पारधी समाजाच्या पालावरची चळवळ
​ज्या समाजाला व्यवस्थेने गुन्हेगार ठरवून वाळीत टाकले होते, त्या पारधी समाजाच्या पालावर जाऊन साहेबांनी चळवळ उभी केली. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यावरील अन्यायाचे जोखड फेकून देण्यासाठी साहेबांनी अहोरात्र कष्ट उपसले.
​अंधश्रद्धेवर प्रहार आणि पोतराजांची मुक्ती
​समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध साहेबांनी क्रांती केली. पोतराजांच्या डोक्यावरील जटा कापून त्यांना त्या जाचातून मुक्त केले आणि त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली. ही केवळ केसांची कत्तल नव्हती, तर ती एका गुलामगिरीच्या मानसिकतेवर केलेली शस्त्रक्रिया होती.
​१८ पगड जातींसाठी अष्टपैलू नेतृत्व
​साहेबांची चळवळ ही केवळ एका विशिष्ट जातीपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी १८ पगड जातींमधील गरिबांना, वंचितांना एकत्र करून न्यायाचा लढा दिला. आजही त्यांनी घडवलेले हजारो निष्ठावान कार्यकर्ते समाजाच्या शेवटच्या घटकासाठी काम करत आहेत, हाच त्यांच्या विचारांचा सर्वात मोठा वारसा आहे.
​क्रांतीची मशाल ज्यांनी हाती घेतली,
अन्यायाविरुद्ध ज्यांनी झुंज मांडली…
अशा लोकनेत्याला, कर्मवीर एकनाथरावजी आवाड यांना कोटी कोटी प्रणाम.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!