Homeमहाराष्ट्र​शिक्षक कॉलनी येथे १ कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक ‘नमो उद्याना’चे दिमाखात उद्घाटन!...

​शिक्षक कॉलनी येथे १ कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक ‘नमो उद्याना’चे दिमाखात उद्घाटन! ​स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब नमो उद्यान असे होणार नामकरण-इनामदार व बनसोड

केज/प्रतिनिधी

केज शहरातील ​ नागरिकांसाठी एक आनंदाची आणि हक्काच्या विरंगुळ्याची बातमी आहे. या भागातील २३ गुंठे ओपन स्पेस (खुली जागा) मध्ये तब्बल १ कोटी रुपये खर्च करून साकारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक ‘नमो उद्याना’चे भव्य उद्घाटन नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड व गटनेते हारुणभाई इनामदार यांच्या सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स
दि.२० मे २०२६ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाले.
​या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारूणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड, नगरसेविका पद्मिनी आक्का शिंदे, नगरसेवक बाळासाहेब गाढवे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर व या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे नाव देणार असे या कार्यक्रमादरम्यान बोलताना ज्येष्ठ नेते हारूणभाई इनामदार
​ यांनी महत्त्वाची घोषणा केली. शिक्षक कॉलनीतील या नमो उद्यानास “स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब नमो उद्यान” असे नाव देण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. या नामकरणामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
​कामाच्या दर्जाबाबत तडजोड नाही: नगराध्यक्षा सौ .सिताताई बनसोड.
​नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, “शिक्षक कॉलनी भागाचा विकास व नागरिकांना उत्तम सोयी-सुविधा देणे हे आपले प्राधान्य आहे आज रोजी पर्यंत या भागातील अनेक रस्त्यांची कामे करण्यात आलेले आहेत उर्वरित रस्त्यांची व नालीचे कामे लवकरच पूर्ण करणार आहोत. या उद्यानाचे काम पूर्णपणे अत्याधुनिक आणि दर्जेदार दर्जाचे केले जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
​मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती
​या उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने:
दैनिक लोकमतचे केज तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार मधुकर शिरसट, पत्रकार प्रकाश मुंडे,
​पत्रकार तात्या गवळी,​शिक्षण व प्रशासकीय क्षेत्र: एम. डी. घुले सर, अंधारे सर, कराड साहेब, मेजर धीवार साहेब, इंजिनिअर इनामदार साहेब,​प्रमुख नागरिक व कार्यकर्ते: शेख खय्युम, मयूर टकले, विकास बिक्कड, धीवार मामा, आमेर इनामदार,रोडे भैया तसेच गुत्तेदार केंद्रे आणि केज नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
​आभार प्रदर्शन:
कार्यक्रमाचा समारोप अत्यंत सोहळेपूर्वक झाला. उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि नागरिकांचे आभार एम. डी. घुले सर यांनी मानले. या उद्यानामुळे शिक्षक कॉलनी परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठीच हे उद्यान एक उत्तम केंद्र ठरणार आहे.
केजच्या वैभवात आणखी एक भर पडणार असून दर्जेदार व अत्याधुनिक सुविधांचे स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब नमो उद्या तीन महिन्यात पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात येईल. या उद्यानाचा फायदा केज शहरासह तालुक्यातील नागरिकांना होणार आहे. या उद्यानाचे काम हे अत्यंत नियोजन पद्धतीने व दर्जेदार क्वालिटीचे होणार आहे यामध्ये कसलेही प्रकारची तोडजोड केली जाणार नाही अथवा हायगय होणार नाही. आम्ही केज वासियांना दिलेल्या शब्दाच्या वचनपूर्ती कडे वाटचाल करत आहोत गटनेते हारुणभाई इनामदार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!