Homeमहाराष्ट्रजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत "बालदिन" साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत “बालदिन” साजरा करण्यात आला.

केज /प्रतिनिधी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज शाळेत दि.१४ नोव्हेंबर २०२५ शुक्रवार रोजी “पंडीत जवाहरलाल नेहरू” यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन करण्यात आले व “बालदिन” साजरा करण्यात आला.पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला.त्यांचे पंडीत जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे नाव होते.ते भारतातील वसाहतविरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी आणि लेखक होते.ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेते होते.भारत देश १९४७ रोजी स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे ते पहिले पंतप्रधान होते.त्यांनी भारताचे जवळपास १६ वर्षं पंतप्रधान म्हणून काम केले.त्यांनी लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रचार केला.त्यांनी भारताला शीतयुद्धाच्या दोन गटांपासुन मुक्त केले.त्यांच्या हयातीपासुन सन्माननीय पंडीत हे त्यांच्या नावापुढे भारतात लावले जात होते.पंडीत नेहरूंना लहान मुले खुप आवडत होती.लहान मुले त्यांना चाचा नेहरू म्हणत असायचे.पंडीत नेहरू यांच्या जयंती दिवशी “बालदिन” साजरा केला जातो.असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.या शाळेचे प्राथमिक पदवीधर शिक्षक डॉ.श्री.मुळे रामकिशन सर यांनी सविस्तर माहिती दिली.शिक्षक श्री.आकश लोंढे सर, राहुल बचुटे सर, आबासाहेब धपाटे सर, श्री संदीप ठोंबरे सर, शिक्षिका श्रीमती भोरे निलावती मॅडम, श्रीमती उटीकर अंजली मॅडम, ट्रेनी शिक्षिका रोहिणी काळे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री राहुल बजरंग बचुटे सर यांनी केले व आभार श्री.आकाश दत्तु लोंढे सर यांनी मानले.या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षिका , ट्रेनी शिक्षिका,शापोआ कामगार, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षण प्रेमी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!