Homeमहाराष्ट्रप्रभाग क्र.७ मध्ये सिमेंट रस्ते व नाली बांधकामाचे हारुणभाई इनामदार यांच्या हस्ते...

प्रभाग क्र.७ मध्ये सिमेंट रस्ते व नाली बांधकामाचे हारुणभाई इनामदार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

केज/प्रतिनिधी

केज शहरातील महात्मा फुले नगर भागातील प्रभाग क्रमांक ७ मधील सिमेंट रस्ते व नाली बांधकामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
यावेळी या भागातील नागरिकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे, ज्येष्ठ नागरिकांचे व पत्रकार बांधवांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते हारूणभाई इनामदार सांगितले की, प्रभाग क्रमांक ७,८,९, मध्ये सध्या सिमेंट रस्ते व नाली आणि पाईपलाईनची कामे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. काही ठिकाणी थोडेफार रस्त्याचे व नालीची कामे बाकी आहेत तेही लवकरच पूर्ण करणार आहोत. आम्ही या भागातील नागरिकांना जो दिलेला शब्द आहे तो शब्द आज रोजी आम्ही पूर्ण करीत आहोत. उर्वरित राहिलेल्या कामापैकी येत्या पंधरा दिवसांमध्ये चार सिमेंट रस्त्याच्या व नाली बांधकामाचे उद्घाटन करून प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी सांगितले की, महात्मा फुले नगर हा भाग माझा असून मी या भागाची रहिवासी आहे व प्रभाग क्रमांक ७ हा माझा प्रभाग आहे. फुलेनगर मधील रस्त्याच्या व नालीच्या बांधकामसह पाईपलाईनची कामे पूर्णतत्त्वाकडे गेलेले आहेत प्रभाग सात मध्ये फक्त दोन-तीन रस्ते करण्याचे बाकी आहेत तेही लवकरच पूर्ण करणार आहोत. आमच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड म्हणाल्या की, महात्मा फुले नगर या भागात वाढती लोकसंख्या व येथील नागरिकांची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही नवीन सहा बोरवेल मंजूर केलेले आहेत लवकरच नवीन बोरवेल घेऊन पाईपलाईन करून नागरिकांना पाणीपुरवठा करून देणार आहोत. पुढे बोलताना बनसोड म्हणाल्या की, या भागातील काही नागरिकांना पाण्याची अडचण भासल्यास त्यांना तात्काळ बोरवेल घेऊन देऊन त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे नगराध्यक्षा सौ.
सीताताई बनसोडे यांनी आश्वासित केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड,गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेविका सौ. पद्मिनी अक्का शिंदे, ज्येष्ठ नागरिक नवनाथ धीवार सर, पाशाभाई शेख, पत्रकार तात्या गवळी, युवा नेते शाहरुख पटेल, डॉ. नौशाद शेख, पत्रकार विवेक बनसोड, बालासाहेब जोगदंड, नितीन धीवार, धम्मानंद गायकवाड, ज्येष्ठ नागरिक, आश्रुबा जोगदंड , जतीन धीवार, अशोक क्षीरसागर, राहुल इनकर, सुहास समुद्रे, अशोक धीवर, किरण जोगदंड, आशुभाई शेख, ज्येष्ठ नागरिक आत्माराम मस्के,सुशिल रोकडे, भाग्यश्री गायकवाड, प्रमिला मस्के, मंडूबाई मस्के, मैनाबाई साळवे, क्षीरसागर मावशी, अंजनाताई जावळे, लोचनाबाई समुद्रे, विमल जोगदंड, सोनालीताई समुद्रे, कौशल्य मस्के यांच्यासह या भागातील महिला, नागरिक, युवक व राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!