अंबाजोगाई/ प्रतिनिधी
आखिल भारतीय संगीत कला,साहित्य,सांस्कृतिक महासंमेलन २०२५ चे आयोजन महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे विदर्भ हिंदी साहित्य संमेलन रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृह मोरभवन राणी झाशी चौकाजवळ दि. २६डिसेंबर ते २८ डिसेंबर पर्यंत करण्यात आले होते.सदरील महासंमेलनामध्ये श्री.रत्नेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील संगीत विभाग प्रमुख प्रा. रमेश ज्ञानोबा सरवदे यांनी सहभाग नोंदवून त्यामध्ये त्यांनी शास्त्रीय संगीतातील राग यमन सादर केला. त्यानंतर मालकंस रागातील भक्तीगीताचे गायन केले , तसेच तोडी रागात अध्धा तिनतालातील बंदीशीचे गायन करून शेवटी लोकगीताचे व हिंदी चित्रपट गीताचेही उत्तम गायन करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले
सदरील कार्यक्रमात प्रा.रमेश सरवदे यांना गेल्या वीस वर्षांपासून च्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय संगीत शिरोमणि पुरस्कार२०२५ आणि राष्ट्रीय अतुल्य भारत पुरस्कार२०२५ देऊन सन्मानित करण्यात आले या संमेलनास महाराष्ट्र उत्तराखंड काश्मीर हिमाचलप्रदेश राजस्थान उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश,त्रिपुरा,गुजरात,बंगाल,छत्तीसगड,तेलंगणा,केरळ,कर्नाटक,आंध्रप्रदेश,बिहार,झारखंड,आसाम,उडीसा,पंजाब,हरियाणा,सिक्कीम,सिमला,रायपूर ईत्यादी राज्यातुन मोठ्या संख्येने कलावंत, साहित्यीक,कवी,गायक,वादक,संगीतकार,नर्तक,सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होते.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून मा.श्रीमंत महाराज मुधोजीराजे भोसले यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.संमेलनाध्यक्ष म्हणून सुभेदार मा.श्री.कुणाल दादा मालुसरे पुणे हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तरप्रदेशचे सांस्कृतिक मंत्री मा.श्री.यशवंतजी निकोसे साहेब ,उत्तराखंड च्या
मिस इंडीया रुपाली वशिष्टा जनकल्याण मंत्री मा.श्री.रविंद्रजी कृष्णचंद्र ठाकुर,मा.श्री.शिवानंद महाराज,झांशी येथील मा.श्री.दयाराम राय नेताजी,सिमला येथून मा.श्री.युधिस्टर राणा,सिक्कीम येथिल मा.श्री.महेंद्र ढोहारे व मा.श्री.टि.बी.छाब्रा सुब्बा,पंजाब चे मा.डाॅ.श्री.गुरुतेजसिंग ब्रार भटिंडा,मा.श्री.डाॅ.सुरेंद्र कुमार कोब्रा,मा.डाॅ.श्री.प्रदीपकुमार टंडन,रायपुरचे मा.डाॅ.पंढरीनाथ रोकडे
,मा.डाॅ.श्री.राकेश कुमार मिश्रा ( रायपुर),मा.श्री.चंद्रपालजी चौकसे (रामटेक),मा.डाॅ.श्री.दिगांबर सिताराम तायडे, मा.डाॅ.श्री.टी.ए.भल आय.पी.एम.अधिकारी,मा.श्री.रविंद्रजी वैद्य वर्धा,मा.डाॅ.श्री.नरेंद्र रोंघे सामाजिक नेते आणि कार्यक्रमाचे आयोजक मा.डाॅ.श्री.क्रांतीजी महाजन ईत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
प्रा.रमेश सरवदे यांना राष्ट्रीय संगीत शिरोमणि पुरस्कार २०२५ व राष्ट्रीय अतुल्य भारत पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.सोमेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मा.ॲड.श्री.गोपाळरावजी कांदे साहेब ,संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.गोवर्धनजी कांदे सर आणि नरहर सेवाभावी शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.गोविंदराव कांदे सर तसेच श्री.रत्नेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.श्री.सतिशजी किलचे सर आणि सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी प्रा . रमेश सरवदे सर यांचे खुप खुप अभिनंदन व कौतुक केले.





















